water tanker
water tanker 
मुख्य बातम्या

पुणे विभागात टंचाई वाढू लागली 

टीम अॅग्रोवन

पुणे  : उन्हाचा चटका वाढताच विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्याच्या कोरडवाहू भागामध्ये पाणी टंचाईच्या झळा वाढू लागल्या आहेत. विभागातील टंचाईग्रस्त १५ गावे ५८ वाड्यांमधील १९ हजार ३०९ नागरिक तसेच साताऱ्यातील २ हजार ७१९ जनावरांची तहार भागविण्यासाठी १५ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली. 

गतवर्षी चांगला पाऊस पडल्याने यंदा विभागातील पाणीसाठे, भूजल पातळीची स्थिती चांगली असल्याने टंचाई कमी आहे. गतवर्षी मे महिन्याच्या सुरुवातीला विभागातील तब्बल ६८५ गावे, ४ हजार २८२ वाड्यांना ८२३ टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. यंदा मात्र अनेक दुष्काळी गावे अद्यापही पाणीदार असल्याने अद्याप टॅंकर सुरू करावा लागला नाही. उन्हाच्या झळा वाढताच टंचाईदेखील वाढणार असल्याने मात्र यंदा टंचाई कमीच राहण्याची शक्यता आहे. 

पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील २ गावे २ वाड्या, खेड तालुक्यातील १ गाव १३ वाड्यांना ३ टॅंकरने पाणी देण्यात येत आहे. तर दुष्काळी बारामती, इंदापूर, पुरंदर तालुक्यात अद्याप एकही टॅंकर सुरू नाही. साताऱ्यातील माण, खटाव, कोरेगाव, वाई, पाटण तालुक्यात टंचाई भासू लागल्याने ७ गावे ९ वाड्यांमध्ये ७ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या अंकलगी, गोंधळेवाडी, सोन्याळ, मडग्याळ ही गावे आणि २६ वाड्यांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी ४ टॅंकर सुरू आहेत. तसेच सोलापूरच्या माढा तालुक्यातील पडसाळे गाव आणि आठ वाड्यांना एका टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने पुणे विभागीय आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले.  पुणे विभागातील पाणी टंचाईची स्थिती 

जिल्हा गावे वाडा टॅंकर 
पुणे १५ ३ 
सातारा
सांगली २६ ४ 
सोलापूर
एकूण १५ ५८ १५ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT