संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात ८२२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

टीम अॅग्रोवन

नगर   : जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी प्रशासनातर्फे ८२२ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तीव्र पाणीटंचाईमुळे दिवसेंदिवस टॅंकरची संख्या वाढत आहे. श्रीरामपूरवगळता जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांतील ५६६ गावे व ३१८२ वाड्या-वस्त्यांवरील १३ लाख ४२ हजार ५७९ नागरिकांना पाणीपुरवठ्यासाठी रोज ८२२ टॅंकर धावत आहेत. 

गेल्या वर्षी अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट दिवसेंदिवस गहिरे होत आहे. ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त गावांतून टॅंकरमागणीच्या प्रस्तावांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. सध्या श्रीरामपूरवगळता जिल्ह्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाथर्डी तालुक्‍यात सर्वाधिक १५३ टॅंकरद्वारे १०७ गावे व ६०८ वाड्या-वस्त्यांवरील दोन लाख ४२ हजार ५१९ नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. राहुरी तालुक्‍यात केवळ तीन टॅंकरद्वारे तीन गावांमधील एक हजार ६०४ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. 

२००३ नंतर मागील वर्षी जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वांत कमी पाऊस झाला. त्यामुळे भूजल पातळीत घट झाली. पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली. उन्हाच्या झळा वाढतील तसतशी टॅंकरची मागणी झपाट्याने वाढत आहे. कोणत्याही स्थितीत नागरिकांची पिण्याच्या पाण्याची अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.  

तालुकानिहाय टॅंकर
संगमनेर   ६८ 
अकोले ११ 
कोपरगाव ११
राहुरी
नेवासे ४३
राहाता ८ 
नगर ७०
पारनेर १३१
पाथर्डी   १५३
शेवगाव ६९
कर्जत ८६
जामखेड ९६ 
श्रीगोंदे  ७३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT