वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटप In Washim district 699 crore peak loan disbursement
वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटप In Washim district 699 crore peak loan disbursement 
मुख्य बातम्या

वाशीम जिल्ह्यात ६९९ कोटींचे पीककर्ज वाटप

टीम अॅग्रोवन

वाशीम : जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना आतापर्यंत ६९९ कोटींचे पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. बँकांनी ८५ हजार १५७ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले आहे. पात्र असलेल्या एकूण खातेदारांपैकी ८१ टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वितरण झाले. जिल्हा उपनिबंधकांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात १ लाख ४७९१ शेतकऱ्यांसाठी १०२५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा बँकेच्या माध्यमातून ६०५ कोटींचा लक्ष्यांक ठेवण्यात आला होता. ६२९१८ शेतकऱ्यांना हे पीककर्ज या बँकेला वाटप करायचे होते. या तुलनेत बँकेने सुमारे ५९३४६ शेतकऱ्यांना ४४९ कोटींचे वाटप केले.  उद्दिष्टाच्या तुलनेत ९४ टक्के शेतकऱ्यांना तर रकमेच्या तुलनेत ७४ टक्के पीककर्जाची रक्कम वाटप केली  आहे. सार्वजनिक, खासगी, व्यावसायिक बँका व विदर्भ कोकण ग्रामीण बँक मिळून ४१ हजार ८७३ खातेदार शेतकऱ्यांचे उद्दिष्ट दिले होते. तुलनेत या बँकांनी २५८११ शेतकऱ्यांना २४९ कोटींचे वाटप केले. या बँकांनी उद्दिष्टाच्या तुलनेत ६१.६४ टक्के खातेदारांना पीककर्जाचा लाभ पोचविला. सर्व बँका मिळून ८५ हजार खातेदारांना आतापर्यंत पीककर्ज मिळाले आहे.  अद्याप १९ हजारांपेक्षा अधिक शेतकरी पीककर्जापासून दूर आहेत. तर निर्धारित केलेल्या १०२५ कोटींपैकी ६९९ कोटींचेच वाटप झाले आहे. सध्या पीककर्ज वाटपाचे काम अंतिम टप्यात आहे. खरीप तसेच रब्बी हंगामासाठी एकूण ११०० कोटी रुपयांचा लक्षांक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT