संस्कृती जपण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले ः मंत्री रावते
संस्कृती जपण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले ः मंत्री रावते 
मुख्य बातम्या

संस्कृती जपण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले ः मंत्री रावते

टीम अॅग्रोवन

सोलापूर : संतांचे व वारकऱ्यांचे माहेरघर असलेल्या पंढरीत एसटी महामंडळाच्या वतीने ३३ कोटी रुपये खर्चून भव्य असे यात्री निवास व सुसज्ज बसस्थानक बांधण्यात येणार आहे. वारकरी संप्रदायाच्या प्रथा, परंपरेला शोभेल असे हे यात्री निवास असेल. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे संस्कार, संस्कृती जपण्याचे काम वारकरी संप्रदायाने केले आहे, असे मत परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी रविवारी (ता. ३) पंढरपुरात व्यक्त केले.

एसटी महामंडळाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या यात्री निवास व बसस्थानकाचा भूमिपूजन सोहळा संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर यांच्या हस्ते करण्यात आला. या सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. 

या कार्यक्रमास माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह देओल, एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक प्रतापसिंह सावंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यअधिकारी श्रीकांत भारती, उपमहाव्यस्थापक राहुल तोरो, सुहास जाधव, विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड, तसेच महाराज मंडळी उपस्थित होती.

या वेळी संत नामदेवांचे वंशज ह.भ.प. माधव महाराज नामदास, संत एकनाथांचे वंशज ह.भ.प. रावसाहेब गोसावी महाराज आणि संत तुकारामांचे वंशज ह.भ.प. संजय महाराज देहूकर आदी महाराज मंडळींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर, महादेव महाराज शिवणीकर, तनपुरे महाराज आदी महाराज मंडळी यांच्यासह राज्याच्या विविध भागांतून आलेले भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT