माती परिक्षण
माती परिक्षण 
मुख्य बातम्या

माती नमुने तपासणीच्या नव्या मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

जळगाव ः नव्या वित्तीय वर्षासाठी माती नमुने संकलन, क्षेत्र मर्यादा व इतर मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. मागील वित्तीय वर्षाच्या तुलनेत नव्या वर्षाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये काहीसा बदल केला जाण्याची शक्‍यता असून, क्षेत्रमर्यादा बदलली जाईल, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.  २०१७-१८ मध्ये ज्या माती नमुन्यांचे संकलन झाले, त्यात बागायतीसाठी अडीच हेक्‍टर व कोरडवाहूसाठी १० हेक्‍टर याप्रमाणे माती नमुन्यांचे संकलन झाले. अर्थातच, अडीच हेक्‍टर बागायती क्षेत्रात जेवढे शेतकरी असतील, त्यांच्यासाठी एकच नमुना गृहीत धरून आरोग्यपत्रिकेचे वितरण झाले, तर कोरडवाहू जमीन क्षेत्रासाठी १० हेक्‍टरमध्ये जेवढे शेतकरी असतील त्यांच्यासाठी एकच माती नमुना संकलित करून या सर्वांना एकच जमीन आरोग्य पत्रिका देण्यात आली.  २०१८-१९ या वित्तीय वर्षात एप्रिल महिन्यापासूून माती नमुन्यांचे संकलन व तपासणीला सुरवात होईल; परंतु या वर्षासाठी अजून माती नमुने संकलन, क्षेत्रमर्यादा याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. मागील वर्षी ६२ हजार ७४२ जमीन आरोग्यपत्रिका वितरणाचे उद्दिष्ट ठरले होते. यातील तीन हजार आरोग्यपत्रिकांते वितरण अजून झालेले नाही. तर २०१८-१९ या वर्षात सुमारे ६३ हजार जमीन आरोग्यपत्रिकांचे वितरण केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  कृषी विकास योजनेच्या सूचना डब्यात जमीन आरोग्यपत्रिका योजना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत माती नमुन्यांचे संकलन व तपासणी केली जात होती. कृषी सहायक माती नमुने संकलित करून ही तपासणी शासकीय प्रयोगशाळेत केली जायची. त्यात एका गावातील १० टक्के क्षेत्रातून माती नमुने संकलित केले जायचे ते वेगवेगळ्या भागात जाऊन संकलित करून पूर्ण गावातील शेतकऱ्यांसाठी या १० टक्के क्षेत्रातून घेतलेल्या माती नमुन्यांच्या आधारे तयार केलेल्या जमीन आरोग्यपत्रिकांचे वितरण केले जायचे; परंतु जमीन आरोग्यपत्रिका योजना लागू झाल्यानंतर हे १० टक्के जमिनीचे सूत्रही मागे टाकले आहे.  प्रतिक्रिया २०१८-१९ या वर्षात माती नमुने संकलनासंबंधी मार्गदर्शक सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या नाहीत. मागील वर्षातील तीन हजार माती नमुन्यांचे संकलन झाले आहे; परंतु काही तांत्रिक बाबींमुळे वितरण झालेले नाही.  - सचिन बऱ्हाटे,  जिल्हा मृदा सर्वेक्षण व चाचणी अधिकारी, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

Natural Disaster in Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरवर निसर्ग कोपला; अतिवृष्टी, भूस्खलनानंतर भूकंपाचे धक्के

Kadavanchi Watershed Project : कडवंची ‘वॉटर बजेट’द्वारे समृद्धी

Sangli Currant Farmers : सांगली, तासगाव येथील बेदाणा सौदे चार दिवस बंद, शेतकरी अडचणीत

Sand Mining : वाळू उपसून तर बघा...

SCROLL FOR NEXT