आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची प्रतीक्षा
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची प्रतीक्षा 
मुख्य बातम्या

आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा खंड आणि नंतर पडलेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, स्कायमेटने पावसाच्या चुकीच्या नोंदी केल्या. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहणार आहेत. विमा कंपनी स्कायमेटची का ? महसूलची पावसाची नोंद ग्राह्य धरून नुकसानभरपाई देणार का? याकडे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आहे. 

आटपाडी तालुक्‍यात मृग बहारात जून आणि जुलैमध्ये बहुतांश शेतकरी बागेचा हंगाम धरतात. जवळपास दहा हजार एकर क्षेत्रावर हंगामात बागा धरल्या होत्या. यातील अनेकांनी डाळिंबाचे विमा भरला. विमा कंपनीच्या निकषानुसार पहिल्या दोन महिन्यांत २१ दिवसांपेक्षा जास्त पावसात खंड पडला, तर खंडाच्या दिवसांप्रमाणे नुकसानभरपाईस शेतकरी पात्र होतात. एकाच वेळी ४५ मिलिमीटर पाऊस पडला, तर दुसऱ्या नुकसानभरपाईस पात्र होतात. इतर रोग, अवकाळी पावसामुळे ही नुकसानभरपाई द्यावी लागते. 

श्रमिकचे आनंदराव पाटील यांनी आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. शेतकऱ्यांना डाळिंबाचा विमा मिळणार का?, की स्कायमेटची पावसाची नोंद ग्राह्य धरून विमा कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करणार, असा शेतकऱ्यांचा प्रश्‍न आहे.    बागा गेल्या, किमान भरपाई तरी मिळेल?

यंदा तालुक्‍यात १५ जूननंतर सलग तीस दिवस पावसामध्ये खंड होता. १५ ऑगस्टनंतर सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये तीन वेळा ४५ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला. तशी नोंद महसूलच्या पर्जन्यमापकात आहे. या पावसामुळे डाळिंबाचे प्रचंड नुकसान झाले. बागा गेल्या, किमान विमा रक्कम तरी मिळेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, विमा कंपनीने स्कायमेटची पावसाची नोंद ग्राह्य धरली. स्कायमेटने पावसात खंड दाखवला नाही. तीन वेळा ४५ मिलिमीटरवर पाऊस पडूनही नोंद केली नाही. सप्टेंबर महिन्यात दीडशे मिलिमीटर पावसाची कमी नोंद दाखवली. त्यामुळे शेतकरी विम्यापासून वंचित राहणार  आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT