पवनी तालुक्‍यात धान केंद्रावर वाढले वेटिंग
पवनी तालुक्‍यात धान केंद्रावर वाढले वेटिंग 
मुख्य बातम्या

पवनी तालुक्‍यात धान केंद्रावर वाढले वेटिंग

टीम अॅग्रोवन

भंडारा  ः राइस मिलमालकांना धान उचल करण्याच्या निविदा अद्यापही प्रकाशित करण्यात आल्या नाहीत. परिणामी धान गोदाम फुल झाल्याने धान केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. पवनी तालुक्‍यातील अड्याळ, कोंढा, पवनी, आसगाव येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र हाउसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे धान खरेदी ठप्प झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे. शासनाने या वर्षी धानाला ५०० रुपये बोनस आणि वाढीव २०० रुपये याप्रमाणे सुमारे २५०० रुपयांचा दर दिला आहे. त्यामुळे शासकीय केंद्रावर धान विक्रीसाठी गर्दी वाढली आहे. असे असताना शासनाकडून मात्र राइस मिलमालकांना धान उचल करण्यासाठी निविदा अद्यापही देण्यात आल्या नाहीत. त्यातच धान गोदाम पॅक झाल्याने विक्रीसाठी धान आणलेल्या शेतकऱ्यांचा धान तीन महिन्यांपासून तसाच पडून आहे.  आसगाव येथील धान खरेदी केंद्रावर दहा हजार २१९ क्‍विंटल धानाची खरेदी झाली. सध्या ३० हजार क्‍विंटलपेक्षा अधिक धान या केंद्रावर मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. पवनी केंद्राची स्थितीदेखील अशीच असून, या केंद्रावर ९ हार ८४० क्‍विंटल धान खरेदी झाली. आसगाव, कोंढा केंद्रावर २ हजार १२५ क्‍विंटल धान खरेदी करण्यात आला. अड्याळ केंद्रावर ६ हजार ४०२ क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. पवनी तालुक्‍यात २८ हजार ७२४ क्‍विंटल धान खरेदी करण्यात आली. त्यापेक्षा कितीतरी पट धान सध्या केंद्रावर पडून आहे. आत्तापर्यंत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे चुकारेही झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाप्रती रोष व्यक्‍त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT