पूर्णवेळ कृषी सहसंचालकाची प्रतीक्षा Waiting for the full-time co-director of agriculture
पूर्णवेळ कृषी सहसंचालकाची प्रतीक्षा Waiting for the full-time co-director of agriculture 
मुख्य बातम्या

पूर्णवेळ कृषी सहसंचालकाची प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

पुणे : पुणे विभागीय कृषी सहसंचालकाची जबाबदारी राष्ट्रीय फलोत्पादन विभागातील (एनएचएम) प्रकल्प व्यवस्थापक बसवराज बिराजदार यांच्याकडे देण्यात आली आहे. ही जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर देण्यात आली असून, पूर्ण वेळ कृषी सहसंचालकांची निवड कधी केली जाणार, असा प्रश्न अधिकारी वर्गातून उपस्थित केला जात आहे.   राज्यात ठाणे, कोल्हापूर, पुणे, लातूर, अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक असे एकूण आठ विभाग आहेत. पुणे विभाग हा राज्यात अव्वल असून, पुणे विभागात नगर, पुणे, सोलापूर असे तीन जिल्हे येतात. तिन्ही जिल्हे बागायती जिल्हे असल्याने येथे शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबविण्यात  येतात.  विशेष हा कृषी योजनांना शेतकऱ्यांनाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने या विभागाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच पुणे विभागात कृषी आयुक्तालय असल्याने राज्याचे सचिव, कृषिमंत्री, केंद्र व राज्य शासनाचे विविध पथके भेटी देण्यासाठी येतात.  पुणे विभागीय कृषी सहसंचालकांना आयुक्त व जिल्हास्तरीय अधिकारी यांच्यासोबत सतत समन्वय ठेऊन सतर्क राहून काम करावे लागते. त्यातच नुकतीच निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे संचालक दिलीप झेंडे यांची नुकतीच विभागीय कृषी सहसंचालक पदावरून पदोन्नती झाल्याने हे पद रिक्त झाले आहे. त्यामुळे या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची गरज आहे, असे अधिकारी वकर्मचारी यांचे म्हणणे आहे.  सध्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात अधीक्षक कृषी अधिकारी पदी रफिक नाईकवडी यांची नुकतीच पूर्ण वेळ अधिकारी म्हणून निवड केली आहे. मात्र, त्याच्याकडेही कृषिमंत्री दादा भुसे यांचे ओएसडी व पोकरा प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांशी वेळा ते मुंबईत कार्यरत असतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकरी, कर्मचारी यांचे प्रश्न सुटण्यास अडचणीचे ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच श्री बिराजदार यांच्याकडेही प्रभारी पदाची जबाबदारी दिल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय मिळेल का नाही, अशी शंका व्यक्त केली जात  आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT