भावांतर अनुदानाची ६० हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा
भावांतर अनुदानाची ६० हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा 
मुख्य बातम्या

भावांतर अनुदानाची ६० हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा

टीम अॅग्रोवन

नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाच्या किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत तूर आणि हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केलेल्या परंतु वजनमाप राहिलेल्या ६० हजार ७२८ शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदानाची प्रतीक्षा आहे. जिल्हा विपणन अधिकारी कार्यालयाकडून पडताळणी केल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या याद्या मुंबई येथे मंजुरीसाठी पाठविण्यात आल्या आहेत.

या तीन जिल्ह्यांतील नाफेड आणि विदर्भ को आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदी केंद्रांवर आॅनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी मंगळवार (ता. १५ मे) पर्यंत २९ हजार ७२ शेतकऱ्यांची ३ लाख ४५ हजार १५२ क्विंटल तूर खरेदी झाली. परंतु, त्यानंतर खरेदी बंद केल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील १० हजार ८८८ शेतकरी,

परभणी जिल्ह्यातील १४ हजार ७८८, हिंगोली जिल्ह्यातील ७ हजार ४२० अशी एकूण ३३ हजार ९६ शेतकऱ्यांच्या तुरीचे वजनमाप करायचे राहिले. त्याचप्रमाणे या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवार (ता. १३ जून) पर्यंत १० हजार ४४६ शेतकऱ्यांचा १ लाख ५५ हजार ६७३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला.

खरेदी बंद झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील १५ हजार ५८६ शेतकरी, परभणी जिल्ह्यातील ५ हजार ४९० शेतकरी, हिंगोली जिल्ह्यातील ६ हजार ५५६ शेतकरी असे एकूण २७ हजार ६३३ शेतकऱ्यांच्या हरभऱ्याचे वजनमाप राहिले. त्यामुळे तीन जिल्ह्यांतील तूर आणि हरभरा मिळून एकूण ६० हजार ७२८ शेतकऱ्यांना भावांतर योजनेअंतर्गत प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान द्यावे लागणार आहे. दरम्यान, तूर खरेदीचे ९५ टक्के तर हरभऱ्याचे ९० टक्के चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान नोंदणी करून वजनमाप न झालेल्या शेतकऱ्यांच्या पीक पेऱ्यांची पडताळणी जिल्हास्तरावर केल्यानंतर या याद्या मंजुरीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आल्या आहेत. भावांतर योजनेअंतर्गत तूर, हरभऱ्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १० क्विंटल दोन हेक्टरच्या मर्यादेत कमाल २० क्विंटलच्या मर्यादेत प्रतिक्विंटल १ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT