वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा ठिय्या
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा ठिय्या 
मुख्य बातम्या

वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा ठिय्या

टीम अॅग्रोवन

भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे प्रभावित झाल्याने या वाघाचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. सिहोरा बस स्थानकासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे वाहतूक प्रभावित झाली होती.  महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या बिनाखी, गोंदेखारी परिसरात काही दिवसांपासून एका पट्टेदार वाघाने दहशत पसरविली आहे. शनिवारी (ता.२५) या वाघाने भर दिवसा दुचाकीस्वारांवर हल्ला केला; तसेच एका तरुणावरदेखील झडप घातली. गोंदेखारी येथे यापूर्वी एका इसमावर या वाघाने हल्ला केला होता. या घटनांमुळे बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, शेतीची कामेदेखील ठप्प झाली आहेत. अशातच रविवारी (ता.२६) सायंकाळी सात वाजता बिनाखी गावशिवारातील राईइस मिलमध्ये हा वाघ शिरला. मील मालक अनिल रहांगडाले यांनी वनविभागाला याची माहिती दिली; परंतु कोणीही तिकडे फिरकले नाही. त्यामुळे नागरिक संतप्त झाले. वाघाचा बंदोबस्त करावा, यासाठी चुल्हाड बस स्थानकासमोर गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी, उमेश तुरकर, माजी सभापती कलाम शेख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.  अखेर आंदोलन मागे सहायक वनसंरक्षक मल्होत्रा, उपवनसंरक्षक विवेक होशिंग वनपरिक्षेत्र अधिकारी लुचे यांनी आंदोलनाला भेट दिली. आंदोलकांशी या वेळी चर्चा करण्यात आली. वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी पाच पथके तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT