विदर्भात अवकाळी पाऊस; गारपीट व वादळाचे थैमान 
मुख्य बातम्या

विदर्भात अवकाळी पाऊस; गारपीट व वादळाचे थैमान

टीम अॅग्रोवन

नागपूर : विदर्भात सर्वदूर गारपीट आणि अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका कापूस, रब्बी गहू, हरभरा, धान या पिकांना बसला आहे. कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.  ग्रामीण भागात अवकाळी पाऊस, गारपिटीने अमरावती, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आठवडाभरापासून नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत शासकीय धान खरेदी सुरू आहे. या केंद्रावर खरेदीच्या प्रतीक्षेत असलेले उघड्यावरील धान भिजल्याने त्याची प्रत खालावली. अमरावती जिल्ह्यात आंबिया बहरातील संत्रा पीक घेण्याच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांनाही अवकाळीचा फटका बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.  शासनस्तरावरून सर्व्हेक्षण व पंचनाम्याचे आदेश होत भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. गहू, खरबूज पिकाचे नुकसान... मी सात एकर शेती करारावर करत आहे. त्याच्या व्यवस्थापनावर सव्वादोन लाख रुपयांचा खर्च झाला. तीन एकरावर गहू, तर चार एकर खरबूज होते. गव्हाची काढणी सुरू असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. त्यामुळे २५ पोती गव्हाचे नुकसान झाले. त्यासोबतच चार एकरांवरील काढणीच्या अवस्थेत असलेल्या खरबूज फळांना गारांचा मार बसल्याने हे पीकदेखील हातचे गेल्याची माहिती पिंपरी बोदडे (ता. नांदगाव खंडेश्‍वर, जि. अमरावती) येथील नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश सुंदरकर यांनी सांगितले.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT