कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न पुरस्कार प्रदान
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न पुरस्कार प्रदान 
मुख्य बातम्या

कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न पुरस्कार प्रदान

टीम अॅग्रोवन

अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटनेतर्फे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरीतरत्न २०१९ हा पुरस्कर देऊन गौरविण्यात आले. रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालय, अखिल भारतीय कृषी विद्यार्थी संघटना आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रायपूर येथे सोमवारी (ता. २०) ‘भावी पिढीसाठी नावीन्यपूर्ण कृषी उपक्रम- कृषी आणि तत्सम क्षेत्रांतील शाश्वत मनुष्यबळनिर्मितीमधील संधी आणि आवाहने’ या विषयावरील पाचव्या राष्ट्रीय युवा परिषदेत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉ. आर. सी. अग्रवाल यांच्या हस्ते डॉ. भाले यांना हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी इंदिरा गांधी कृषी विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. कर्नल. एस. के. पाटील, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण बँकेचे व्यावसायिक महाव्यवस्थापक एम. सोरेन, अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे सचिव डॉ. आर. पी. सिंग, आसाम कृषी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू डॉ. व्ही. एस. बघेल, अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे भूतपूर्व अध्यक्ष डॉ. एन. सी. पटेल यांच्यासह कृषी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. सहदेव सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT