शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची चाकणमध्ये वाहतूक पोलिसांकडून अडवणूक Of vehicles transporting agricultural produce Obstruction by traffic police in Chakan
शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची चाकणमध्ये वाहतूक पोलिसांकडून अडवणूक Of vehicles transporting agricultural produce Obstruction by traffic police in Chakan 
मुख्य बातम्या

शेतीमालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची चाकणमध्ये वाहतूक पोलिसांकडून अडवणूक

टीम अॅग्रोवन

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांचा शेतीमाल कमी वेळेत मुंबईत पोहोचावा म्हणून कोट्यवधींचा खर्च करून शासन रस्ते, दळणवळणाच्या सुविधा निर्माण करीत आहे. दुसरीकडे आजच्या परिस्थितीत अनेक अडथळे पार करून शेकडो किलोमीटरचे अंतर कापत मुंबईत फळे, शेतीमाल घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर चाकण परिसरात वाहतूक पोलिसांकडून शुल्लक कारणांसाठी त्रास दिला जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप व आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. बुलडाणा जिल्ह्यातूनही सीताफळ भरून वाहने दररोज मुंबईला जातात. शुक्रवारी (ता. ८) वाहनातून साधारणपणे दोन टन सीताफळ मुंबईकडे घेऊन निघालेली वाहने ओव्हरलोडच्या नावाखाली चाकण परिसरात महामार्गावर अडवून ठेवण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना मुंबई बाजारात पोहोचायला दोन-अडीच तास उशीर झाला. हीच वाहने पहाटे साडेचार, पाच पूर्वी पोहोचली असती, तर सीताफळांना दर चांगला मिळाला असता. एका वाहनामागे किमान पाच हजारांचा फटका या सीताफळ उत्पादकांना बसला आहे. ही माहिती देताना संबंधित शेतकरी ढसाढसा रडत होता. गेल्या आठवड्यात जालना येथे पोलिसांनीही वाहनातून रिकामे क्रेट घेऊन परत येत असताना वाहन अडवून हुज्जत घातली. दोनशे रुपये दिल्यानंतर वाहन सोडले. हे कायम घडते. जर असाच त्रास दिला जाणार असेल, आम्ही शेतीमाल कसा विकायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया

आम्ही गाडी भाड्याने ठरवताना वाहनाची संपूर्ण कागदपत्रे, विमा, चालकाकडे परवाना आहे की नाही, हे पाहूनच ठरवते. सर्व कायदेशीर बाबी न्याहाळूनच वाहन नेतो. सीताफळाची गाडी मुंबईच्या बाजारपेठेत पोहोचायला दीड-दोन तास उशिर झाल्याने भाव कमी मिळाला. एका गाडीमागे पाच हजारांचे नुकसान झाले. पोलिसांनी गाडी अडवली नसती तर हा तोटा झाला नसता. मायबाप राज्यकर्ते याकडे लक्ष देतील, अशी अपेक्षा आहे. - सीताफळ उत्पादक शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT