सांगली जिल्ह्यात पावसाने भाजीपाला, आंबा पिकांचे नुकसान
सांगली जिल्ह्यात पावसाने भाजीपाला, आंबा पिकांचे नुकसान 
मुख्य बातम्या

सांगली जिल्ह्यात पावसाने भाजीपाला, आंबा पिकांचे नुकसान

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यातील इस्लामपूर, वाळवा, शिराळा, तासगाव, खानापूर तालुक्‍यांत गारांसह वादळी पावसाने शनिवारी (ता. १३) सायंकाळी सातच्या सुमारास हजेरी लावली. शिराळा तालुक्‍यात विजेच्या कडकडाटासह वादळी वारे व गारपिटीसह पावसाने एक तास हजेरी लावली. चांदोली धरण परिसरात धो-धो पाऊस सुरू झाला. सायंकाळी पाच वाजल्यापासून शिराळ्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला.

 अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिक व शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. भाजीपाला व आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले. 

इस्लामपूर, वाळवा परिसराला पावसाने तासभर झोडपून काढले. कामेरी, येलूर, ऐतवडे खुर्द, आष्टा, नवेखेड आदी परिसरांत सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर मोडून पडली होती. कवठेमहांकाळ तालुक्‍यातील तिसंगी येथे अनेकांच्या घरावरचे पत्रे उडून गेले; त्यामुळे घरांचे मोठे नुकसान झाले.  

शिराळा तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील कोकरूड, बिळाशी, शेडगेवाडी, येळापूर, मेणी, चरण तसेच उत्तर भागातील वाकुर्ड, शिरशी, अंत्री, गिरजवडे आदी परिसरांत सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजेच्या कडकडाटात शनिवारी (ता. १३) सायंकाळी तुफानी पाऊस झाला. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. उन्हात घातलेले ज्वारीचे व मक्‍याचे वाळवण, त्याचबरोबर गवत, कडबा, शेण्याच्या गोवऱ्या पावसात भिजल्या. शिवारातील मका पीक भुईसपाट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Market : दरात तेजीच्या अपेक्षेने तूर उत्पादकांनी विक्री रोखली

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा येलो अलर्ट

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

SCROLL FOR NEXT