शालेय पोषण आहारासाठी भाजीपाल्यांचे उत्पादन
शालेय पोषण आहारासाठी भाजीपाल्यांचे उत्पादन 
मुख्य बातम्या

शालेय पोषण आहारासाठी भाजीपाल्यांचे उत्पादन

टीम अॅग्रोवन

सायगाव, ता. येवला : येथील महादेव वाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात रासायनिक अवशेषमुक्त पालेभाज्या मिळाव्यात, यासाठी येथील उपक्रमशील शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्याचा सहभाग व पालकांच्या सहकार्यातून शालेय परिसरात ५ गुंठे क्षेत्रावर परसबाग उभी राहिला आहे. यामध्ये पालेभाज्या व फळ भाज्यांची लागवड करण्यात आली आहे. याकामी येथील उपक्रमशील शिक्षक देविदास जानराव व अमर गावीत यांनी पुढाकार घेतला आहे. शालेय परिसरातील गादी वाफे बनविण्यात आले आहेत. सिंचनासाठी तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्यात येते. पीक व्यवस्थापन कामात विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. पिकवलेला भाजीपाला विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात दिला जातो. यामुळे शाळेच्या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे. याकामी शाळेचे मुख्याध्यापक देविदास जानराव, अमर गावीत, अध्यक्ष गणपत इप्पर, उपाध्यक्ष संदीप माळी, जावेद शेख, महेंद्र आव्हाड, मदतनीस रेखा जानराव यांचे यासाठी विशेष लक्ष असते. पाल्यांना सकस आहार मिळावा यासाठी लागणारा अतिरिक्त किराण्याचा खर्च पालक करत असतात. अतिरिक्त उत्पादित भाजीपाल्याची विक्री  शाळेच्या ५ गुंठे परिसरात लागवड केलेला विविध पोषण आहारात वापरून उरतो. हा भाजीपाला स्थानिक ग्रामस्थांना विकला जातो. यातून मिळणारा पैसा शाळेच्या कामात वापरला जातो.

उपक्रमातून श्रमप्रतिष्ठा, नीटनेटकेपणा, सामाजिक एकोपा, स्त्री-पुरुष समानता, संवेदनशीलता अशा विविध मूल्यांची रुजवणूक या उपक्रमाच्या माध्यमातून होत आहे. शाळकरी वयातच मूल्यांची रुजवणूक झाल्यास निकोप आणि निरोगी समाजव्यवस्था निर्माण होऊ शकते, यातून हा देखील एक हेतू साध्य होऊ शकतो. असा दुहेरी फायदा या उपक्रमातून साध्य झाला आणि होत राहील.- देविदास जानराव, शिक्षक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT