वसंतराव नाईक कृषी पुरस्कार वितरण 
मुख्य बातम्या

वसंतराव नाईक यांच्या योगदानामुळे महाराष्ट्र समृद्ध : येरावार

टीम अॅग्रोवन

पुसद, जि. यवतमाळ  : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे केवळ हरितक्रांतीचेच जनक नव्हते, तर त्यांनी भूदान चळवळ, रोजगार हमी योजना, पंचायतराज संकल्पना राबविल्या. वसंतराव नाईक यांच्या बहुआयामी योगदानामुळे महाराष्ट्राला समृद्धी व संपन्नता लाभली, असे विचार पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्‍त केले.

पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे भूमिपुत्र वसंतराव नाईक यांच्या ३९ व्या स्मृती दिन सोहळ्यात रविवारी (ता.३०) पालकमंत्री मदन येरावार अध्यक्ष पदावरून बोलत होते. व्यासपीठावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रप्रमुख डॉ. सय्यद शाकीर अली, माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, आमदार नीलय नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषिभूषण दीपक आसेगावकर, ॲड. आशिष देशमुख, जय नाईक, इंद्रनील नाईक, के. डी. जाधव, डॉ. शेषराव सूर्यवंशी, धनंजय जोशी, प्रा. गोविंद फुके, प्रा. अप्पाराव चिरडे, सुरेश पाटील जाधव, नीळकंठ पाटील, विजय जाधव, अनिरुद्ध पाटील, विजय माने, रियासत अली उपस्थित होते.

या स्मृती दिन सोहळ्यात राज्यातील सात कर्तबगार शेतकरी व दोन कृषिशास्त्रज्ञांचा वसंतराव नाईक कृषी पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृति मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

या वेळी राज्यमंत्री येरावार म्हणाले की, राज्य सरकारचा ‘शेतीप्रधान अर्थसंकल्प’ हे त्याचे द्योतक आहे. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाच्या कामाला प्रथम सुरवात केली. त्यांचे कार्य सरकार पुढे वेगाने नेत असल्याचे ते म्हणाले. नाईक प्रतिष्ठानच्या शेतकऱ्यांच्या गौरवातून युवा शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल, असे सांगून त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची प्रशंसा केली. या वेळी प्रा. दिनकर गुल्हाने व प्राचार्य गणेश पाटील यांनी संपादित केलेल्या ‘हरितदूत’ या स्मरणिकेचे प्रकाशन राज्यमंत्री येरावार यांच्या हस्ते झाले. प्रा. छाया कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. उत्तम रुद्रवार यांनी आभार मानले.

सत्कारमूर्ती शेतकरी, शास्त्रज्ञ माजी आमदार विठ्ठलराव घारे (काळुस्ते, इगतपुरी), ब्रह्मदेव सरडे (सोगाव, सोलापूर), आनंद गाडेकर (बोरबन, नगर), किरण डोके (कंदर, सोलापूर), रवींद्र मेटकर (बडनेरा, अमरावती), सुरेश पतंगराव (अंबोडा, यवतमाळ), सीताफळ महासंघ पुणे (श्‍याम गट्टाणी), कुलगुरू डॉ. विलास भाले (अकोला), डॉ. व्ही. चिन्नाबाबू नाईक (केंद्रीय कापूस संशोधन केंद्र, नागपूर).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या विक्रीत ३४ टक्के वाढ; खरेदीला पसंती का?

Farmer Justice: अखेर अपघातग्रस्त ट्रॅक्टर शेतकरी कुटुंबाला मिळाला परत!

Agriculture Success Story: बचत गट ते शेतकरी उत्पादक कंपनी

Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर

Farm Pond: शेततळ्यांसाठीचे १७ हजारांवर अर्ज रद्द

SCROLL FOR NEXT