निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त निर्मळ वारी
निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त निर्मळ वारी 
मुख्य बातम्या

निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त आरोग्यदायी निर्मळ वारी

टीम अॅग्रोवन

नाशिक  : पंढरपूरला आषाढी वारीमुळे होणारी अस्वच्छता निर्मळ वारी अभियानातून गेल्या तीन वर्षांपासून दूर झाली आहे. याच पद्धतीने यंदा त्र्यंबकेश्‍वर येथे संत निवृत्तिनाथ यात्रेनिमित्त येत्या 10 ते 12 जानेवारी या काळात निर्मळ वारी राबविली जाणार आहे. त्यासाठी वारकऱ्यांच्या मुक्कामाची गर्दीची दहा ठिकाणे निश्‍चित करून, तेथे बाराशे फिरती शौचालये, दोन हजार 800 स्वयंसेवक व शेकडो कचराकुंड्यांद्वारे वारकऱ्यांची आध्यात्मिक वारी निर्मळ व आरोग्यदायी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

त्र्यंबकेश्‍वरला दरवर्षी पौष वद्य एकादशीला संत निवृत्तिनाथ यात्रेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो दिंड्यांद्वारे लाखो वारकरी येतात. ते किमान दोन मुक्काम येथे करतात. या काळात त्यांच्यासाठी होणारे अन्नदान व त्यातून निर्माण होणारा कचरा, उघड्यावर शौचास बसल्यामुळे परिसरात उघड्या मैदानांवर निर्माण झालेली हागणदारी, फेकून दिलेल्या अन्नाचे ढिग व प्लॅस्टिकचे कप, पत्रावळ्यांनी व्यापलेल्या ब्रह्मगिरीच्या दऱ्याखोऱ्या यामुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व प्रदूषण होते. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार यात्रेनंतर त्र्यंबकेश्‍वरमध्ये घरटी किमान एकाला विषज्वराची लागण होते.

त्र्यंबकेश्‍वरच्या यात्रेत गेल्या 17 वर्षांपासून वारकऱ्यांना औषधे देण्याचे काम करणाऱ्या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांचे या समस्येवर उपाय शोधण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यातच गेल्या तीन वर्षांपासून ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांमध्ये राज्य सरकारतर्फे राबविल्या जाणाऱ्या निर्मळ वारी अभियानामुळे दिंडी मुक्कामी थांबणाऱ्या गावांबरोबरच प्रत्यक्ष पंढरपूरमधील रोगराईचे प्रमाण 75 टक्‍क्‍यांनी कमी झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे संत निवृत्तिनाथांच्या यात्रेतही निर्मळ वारी अभियान राबविण्याचा संकल्प करण्यात आला.

शासनाने फिरती शौचालये, कचरापेटी, मैला वाहून नेणारी वाहने, आरोग्य कर्मचारी आदी पायाभूत सुविधांसाठी निधी देण्याची तयारी दर्शवल्यामुळे पंढरपूरप्रमाणेच संत निवृत्तिनाथांचीही वारी आता निर्मळ होणार आहे. या निर्मळ वारीसाठी स्वयंसेवक होऊ इच्छिणाऱ्यांनी कृपया वनवासी कल्याण आश्रमाशी संपर्क साधावा. - डॉ. भरत केळकर , समन्वयक निर्मळ वारी, त्र्यंबकेश्‍वर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT