नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण, पात्र याद्या लावल्या फलकावर
नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण, पात्र याद्या लावल्या फलकावर 
मुख्य बातम्या

नांदर्खे, खोंडमळीत आधार प्रमाणीकरण, पात्र याद्या लावल्या फलकावर

टीम अॅग्रोवन

नंदुरबार  ः महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नांदर्खे आणि खोंडामळी येथील पात्र शेतकऱ्यांची यादी सोमवारी (ता. २४) प्रसिद्ध करत आधार प्रमाणीकरणास सुरुवात करण्यात आली. जाहीर झालेल्या यादीत नांदर्खेच्या  २२२ आणि खोंडामळीच्या २१२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, पात्र शेतकरी कर्जमुक्तीनंतर एप्रिलपासून पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली, त्यात वरील दोन्ही गावांचा समावेश आहे. तेथील आपले सरकार सेवा केंद्र, विविध कार्य सोसायटी शाखा, जिल्हा बॅंक शाखा अशा विविध ठिकाणी ही यादी प्रदर्शित करण्यात आली. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया इतरही गावांमध्ये तातडीने सुरू करण्यात येणार आहे.  यादीनुसार पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात येत असून प्रमाणिकरण प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे. प्रमाणपत्र प्राप्त शेतकऱ्यांना शासनातर्फे कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. प्रमाणिकरण करताना खाते क्रमांक, आधार आणि बोटांचे ठसे यावरून माहिती तपासण्यात येत आहे.  जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक आणि सहायक उपनिबंधक निरज चौधरी यांनी दोन्ही गावांना भेट देऊन प्रमाणिकरण प्रक्रियेची माहिती घेतली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते खोंडमाळी येथे प्रातिनिधीक स्वरूपात आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. मंगळवारीदेखील ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT