वाशीम जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’साठी  ५० हजारांवर शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण
वाशीम जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’साठी ५० हजारांवर शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण 
मुख्य बातम्या

वाशीम जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’साठी ५० हजारांवर शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण

टीम अॅग्रोवन

वाशीम  : राज्य शासनाच्या महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी जिल्हा यंत्रणांकडून प्रक्रिया वेगाने केली जात आहे. या जिल्हयात ८३ हजार ६३४ शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांपैकी ५० हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण करण्यातसुद्धा आले आहे. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमुक्ती योजनेची यादी संबंधित गावांमध्ये २९ फेब्रुवारीला प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपले सरकार सेवा केंद्र, बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रीया केली जात आहे. जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत सुमारे ५० हजार पेक्षा अधिक शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. आधार प्रमाणीकरण करण्याचा मूळ उद्देश कर्जखात्यात किती रक्कम थकीत आहे, त्याची शेतकऱ्यांना माहिती देऊन मान्यता घेणे आहे. आधार प्रमाणीकरण करताना कर्जमुक्तीच्या पोर्टलवर यादीतील विशिष्ट क्रमांक वा आधार क्रमांक टाकल्यानंतर संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, थकीत कर्जाची रक्कम संगणकाच्या स्क्रीनवर दिसते. ही माहिती अचूक व मान्य असेल तरच ‘मान्य’ पर्याय निवडून शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे लागते. जर संगणकाच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या माहितीमधील आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, कर्जाची रक्कम जुळत नसल्यास किंवा रक्कम चुकीची असल्यास शेतकऱ्यांनी ‘अमान्य’ पर्यायाची निवड करून आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ‘अमान्य’ केलेली प्रकरणात संबंधित शेतकऱ्यांची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे पाठवून त्यावर जिल्हास्तरीय समिती निर्णय घेते. प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र, तक्रारीची प्रत देणे बंधनकारक ‘मान्य’ अथवा ‘अमान्य’ यांपैकी कोणताही पर्याय निवडून आधार प्रमाणीकरण पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना संबंधित आपले सरकार सेवा केंद्र, बँकेने अथवा सहकारी सेवा सोसायटीने लगेचच पूर्ण झाल्याच्या प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र अथवा तक्रारीची प्रत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्रावर बँकेचे नाव, बँक खाते क्रमांक व कर्ज रक्कम नमूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संबंधित आपले सरकार सेवा केंद्र अथवा बँकेत आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर आपल्या प्रमाणपत्राची प्रत प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT