cattale
cattale 
मुख्य बातम्या

पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरण

टीम अॅग्रोवन

पुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेतली जाणार आहे. यंदा आयुक्तालयाकडून जनावरांना लाळ्याखुरकत आणि ब्रुसेलोसीस (संसर्गजन्य गर्भपात) या दोन्ही आजारांसाठी राज्यातील सुमारे दोन कोटी १४ लाख जनावरांना येत्या १५ मार्चनंतर लसीकरण केले जाणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पशुपालन हा पूरक व्यवसाय केला जातो. त्यामुळे अनेक शेतकरी गाई, म्हशी, कालवडीचा सांभाळ करतात. मात्र, अनेक वेळा जनावरांना लाळ्याखुरकत, ब्रुसेलोसीस या दोन्ही प्रकारच्या विषाणूजन्य आजारांना बळी पडतात. म्हणून शासनामार्फत लाळ्याखुरकत या आजारावर वर्षातून दोन वेळा लसीकरण केले जाते. प्रामुख्याने मार्च-एप्रिल आणि सप्टेंबर-ऑक्टोबर अशा महिन्यात लसीकरण केले जाते. तर ब्रुसोलोसीस या आजारासाठी वर्षाभरात केव्हाही लसीकरण केले जाते.  यंदा केंद्र शासनाने जनावरासाठी लसीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत पशुसंवर्धन आयुक्तालयाने शासनाकडे लसीकरणासाठी सुमारे १५० कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. केंद्र शासनाने मागणी केलेल्या निधीला मंजुरी दिली असून लसीकरणाची मोहीम मार्च महिन्यात हाती घेतली जाणार आहे. लसीकरण शासकीय पशुवैद्यकामार्फत केले जाणार असले तरी यामध्ये खाजगी पशुवैद्यक, जिल्हा दूध संघ, तालुका दूध संघ यांनीही या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी केले. राज्यात असलेल्या जनावरांची संख्या गायी    एक कोटी ३९ लाख म्हशी    ५६ लाख शेळ्या    १ कोटी ६ लाख कालवडी     २४ लाख  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

Interview with Dashrath Tambale, Director of Atma : सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीची सक्ती नाहीच...

Rural Story : जागरण

Sugarcane Management : खोडवा उसाचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT