Animal Husbandary  
मुख्य बातम्या

सांगली पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदांचे ग्रहण

जिल्ह्यात पशुवैद्यकीयचे १०३ दवाखाने असून यामध्ये २३३ पदे मंजूर असून त्यापैकी ९२ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात पशुधनाची संख्या ९ लाख ९० हजार इतकी आहे.

टीम अॅग्रोवन

सांगली ः जिल्ह्यात पशुवैद्यकीयचे १०३ दवाखाने असून यामध्ये २३३ पदे मंजूर असून त्यापैकी ९२ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात पशुधनाची संख्या ९ लाख ९० हजार इतकी आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाअभावी आजारी पशुधनावर वेळेत औषधोपचार होत नाहीत. 

जिल्ह्यातील १३ लाख १७ हजार ८६६ इतके पशुधन आहे. त्यापैकी ९ लाख ९० हजार म्हैस, गाई, मेंढ्या यांची संख्या आहे. जिल्ह्यात पशुवैद्यकीयचे १०३ दवाखाने आहेत. पशुधनांना घटसर्प, फऱ्या, यासह अन्य साथींच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून लसीकरण करण्यात येते. त्यानुसार लसी आणि औषधांची मागणी केली जाते. ही लस जनावरांना दिली जाते.  मात्र पशुसंवर्धन विभागात २३३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९२ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी शासनाने घोषणा केली होती. परंतु अद्यापही भरतीची प्रक्रिया पूर्ण झाली नाही.  जिल्ह्यात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे शेतकरी पाहू लागले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसाय प्रमुख होऊ लागला आहे. जिल्ह्यातील दररोजचे दूध संकलन १३ ते १४ लाख इतके आहे. तर आटपाडी तालुक्यात खिलार जनावरांची पैदास मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र पशुसंवर्धन विभागात पदे रिक्त असल्याने पशुधनाची तपासणी, लसीकरणासह अन्य औषधोपचार वेळेवर होत नाहीत. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे ही मोठी समस्या आहे.  जिल्ह्यातील पशुधन (लाखांत)  ४.९२  म्हैस  ३.४१  गाई वर्ग  १.५७  मेंढ्या  ९.९०  एकूण 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT