ठिबक सिंचन पद्धतीने हरभरा, करडई पेरणीचा प्रयोग
ठिबक सिंचन पद्धतीने हरभरा, करडई पेरणीचा प्रयोग 
मुख्य बातम्या

ठिबक सिंचन पद्धतीने हरभरा, करडई पेरणीचा प्रयोग

टीम अॅग्रोवन

हिंगोली ः तेलगाव (ता. वसमत) येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब राऊत यांनी यंदाच्या दुष्काळी स्थितीत सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी झाल्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीने शेत ओलावून तुलनेने कमी पाण्यावर येणाऱ्या हरभरा आणि करडई या पिकांची पेरणी केली आहे. त्यांनी आॅक्टोबर महिन्यात सोयाबीननंतर कमी मशागतीवर पेरणी केलेले ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिलेले हरभऱ्याचे पीक काढणीस आले आहे. यंदा हिंगोली जिल्ह्यात कमी पाऊस झाला. रब्बी पेरणीसाठी जमिनीत ओलावा उपलब्ध नसल्यामुळे अनेकांना विशेषतः कोरडवाहू शेतकऱ्यांना पेरणी करता आली नाही. तेलगाव येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब राऊत यांच्याकडे सिंचनासाठी बोअरची व्यवस्था आहे.

परंतु कमी पावसामुळे बोअरचे पाणी कमी पडू लागले. या परिस्थितीत प्रयोगशील वृत्तीच्या राऊत यांनी जिद्द न सोडता सोयाबीनच्या काढणीनंतर आॅक्टोबर महिन्यात केवळ एक वखर पाळी घालून एक एकर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्यासाठी चार फूट अंतरावर लॅटरल अंथरले. यापैकी १० गुंठे हरभऱ्यामध्ये उसाची लागवड केली. हरभरा काढणीस आला आहे. तर ऊस रसवंतिसाठी उपयोगात येणार आहे. 

राऊत यांनी नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्या ठिकाणी एक एकरवर चार फूट अंतरावर ठिबकच्या लॅटरल अंथरून पेरणीसाठी जमीन ओलवून घेतली. त्यानंतर लॅटरलच्या बाजूने दोन ओळींत सव्वा फूट अंतर सोडून हरभऱ्याची पेरणी केली. हरभऱ्याच्या आठ ओळींनंतर करडईच्या दोन ओळींची पेरणी केली. नेहमी हरभरा पिकास तुषार संचाने पाणी देत असतो. परंतु यंदा कमी पाण्यात प्रथमच ठिबक सिंचन पद्धतीने हरभरा व करडईचे पीक घेतले, असे बाळासाहेब राऊत यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT