अवकाळी पावसाने सोलापुरात नुकसान With unseasonal rains Damage in Solapur
अवकाळी पावसाने सोलापुरात नुकसान With unseasonal rains Damage in Solapur 
मुख्य बातम्या

अवकाळी पावसाने सोलापुरात नुकसान

टीम अॅग्रोवन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला असून, अवकाळी पाऊस आणि गारपिटीने काही भागात रब्बी पिकांसह फळबागांचे नुकसान झाले आहे. सोमवारी (ता. १२) पुन्हा दिवसभर कधी ऊन्ह आणि कधी ढगाळ असे वातावरण राहिले. 

बार्शी तालुक्यातील पिंपरी, वालवड, चारे येथे रविवारी (ता. ११) वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. तर उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, कारंबा, पाकणी, कोंडी परिसरात सायंकाळी गारांसह हलकासा पाऊस पडला. यामुळे काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे नुकसान झाले. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण आहे.

जिल्ह्यात अनेक भागात सध्या ज्वारीची काढणी सुरु आहे. तर काही ठिकाणी मळणीची कामे सुरु आहेत. तसेच कडब्याची ढेपणी लावण्याची कामेही सुरू आहेत. 

रविवारी मोहोळ तालुक्यातील नरखेड, मसले चौधरी, भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बार्शी तालुक्यातील वालवड, चारे, पिंपरी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे रब्बी कांदा पिकाचे नुकसान झाले.

काही ठिकाणी शेतात काढून पडलेली ज्वारी, खळ्यातील पिके भिजली. वाऱ्यामुळे गंजीचा कडबा उडाल्याने नुकसान झाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज, कारंबा, पाकणी, कोंडी परिसरात गारांसह हलकासा पाऊस झाला. रात्री नऊ वाजता झालेल्या या पावसामुळे उशिरा काढणीस आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

Kharif Season 2024 : ‘वनामकृवि’च्या खरीप बियाणे विक्रीचा शनिवारी प्रारंभ

Turmeric Cultivation : हळदीची लागवड वाढणार

Straight Cotton Variety : सरळ कापूस वाण यंदाही अल्प

Karvand Market : डोंगरची काळी मैना बाजारात दाखल

SCROLL FOR NEXT