पीक झाकण्याची लगबग
पीक झाकण्याची लगबग 
मुख्य बातम्या

नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत अवकाळी पावसाची हजेरी

टीम अॅग्रोवन
परभणी  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक भागांत शुक्रवारी (ता. १६) पहाटे पाच वाजल्यापासून दुपारपर्यंत अधूनमधून रिमझिम पाऊस सुरू होता.वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाच्या वेधशाळेत शुक्रवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १.८ मिमी पावसाची नोंद झाली.
 
नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई तसेच हळदीची सुगी ऐन भरात आहे, परंतु गेल्या आठवड्यापासून जोराच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे कापणी केलेल्या पिकांचे भिजून नुकसान होत आहे.
 
कापणी केलेल्या ज्वारी, गव्हाच्या पेंढ्यांची पसर तसेच हरभरा, करडईचे कापणी केलेले पीक शेतामध्ये पडून आहे. पावसामुळे ते भिजत आहे. पिकांचे पावसापासून संरक्षण करताना शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे.
 
सुगी ऐन भरात असताना अवकाळी पाऊस पाठ सोडायला तयार नाही. हाताशी आलेला घास हिरावण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत या तीन जिल्ह्यांतील अनेक भागांत रिमझिम पाऊस सुरू होता. आभाळ भरून आल्यामुळे पावसाळी वातावरण झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT