आत्महत्याग्रस्त मुधोळकर यांच्या पत्नी अनुसयाबाई यांच्याशी संवाद साधताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव.
आत्महत्याग्रस्त मुधोळकर यांच्या पत्नी अनुसयाबाई यांच्याशी संवाद साधताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष मनीष जाधव. 
मुख्य बातम्या

अपूर्ण विहीर, नोकरीचे आश्‍वासन हवेत विरले

टीम अॅग्रोवन

यवतमाळ : शेतकरी पितापुत्राच्या आत्महत्येनंतर प्रशासनाने या कुटुंबाला दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता गेल्या वर्षभरात झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. अशा कोडगेपणामुळेच आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये आशावाद निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप या पार्श्‍वभूमीवर शेतकरी नेते मनीष जाधव यांनी केला आहे.  तीन एकर कोरडवाहू शेती, परिणामी वाढलेला कर्जाचा बोजा, नापिकी, कुटुंबातील सदस्यांचे आजारपण या कारणांमुळे शेतकरी काशीराम मुधोळकर आणि त्यांचा मुलगा अनिल यांनी एकाच झाडाला गळफास लावत आत्महत्या केली होती. गेल्या वर्षी २३ ऑगस्ट २०१६ रोजी ही दुर्देवी घटना घडली. आजही या कुटुंबावर २७ हजार रुपयांचे खासगी कर्ज आहे. कुटुंबातील सहा सदस्यांच्या गरजा भागविण्याचे आव्हानदेखील कायम आहे.  दरम्यान, पितापुत्राच्या आत्महत्येनंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. आमदार राजू तोडसाम, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, आमदार ख्वॉजा बेग, माजी मंत्री संजय देशमुख, आमदार बच्चू कडू, विलास पाटील, विधान परिषदेचे उपसभापती माणीकराव ठाकरे यांनी या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यानंतर या कुटुंबांचे दुःख काहीसे दूर होईल, असे वाटत होते; परंतु आजही समस्यांच्या जोखडात हे कुटुंब असल्याचे वास्तव आहे.  योजनेतील विहीर अपूर्णच  काशीराम मुधोळकर यांच्या पत्नी अनुसयाबाईने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रोजगार हमी योजनेतून विहीर देण्यात आली. गेल्या वर्षभरात ती पूर्ण झाली नाही. ५० कोंबड्या देण्यात आल्या; त्यातील ३५ पहिल्याच आठवड्यात आजारपणामुळे मेल्या. एक लाखाच्या चेकचा लाभ तो तेवढा मिळाला; मात्र प्रशासनाकडून सुनील या मुलास नोकरीचे आश्‍वास देण्यात आले होते. त्याची पूर्तता अद्यापही झालेली नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT