उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसले 
मुख्य बातम्या

शरद पवार साताऱ्यातून लढले, तर मी फॉर्मच भरणार नाही ः उदयनराजे भोसले

टीम अॅग्रोवन

सातारा  : ज्येष्ठ नेते शरद पवार साताऱ्यातून लोकसभेला उभे राहिले, तर मी फॉर्म भरणार नाही. पण त्यांनी एकच करावे दिल्लीतील त्यांचा बंगला आणि गाडी वापरायची मुभा तेवढी द्यावी, असे प्रतिपादन माजी खासदार व भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांनी केले. 

दरम्यान, पवारसाहेबांकडून तुमच्यावर टीका होतेय याचे वाईट वाटते का? या प्रश्‍नावर मात्र, उदयनराजे भावनिक झाले. ‘‘ते आदरणीय नेते असून काल, आज आणि भविष्यातही आदरणीय राहतील. आज मला माझ्या वडिलांची आठवण येते. त्यांच्यानंतर पवारसाहेबांनी मला प्रेम दिले,’’ असे म्हणत उदयनराजेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यावर सर्वबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात ते म्हणाले, की ऐन तारुण्याचे दिवस मी वाया घालविले आहेत. पवार साहेबांविषयी आदराने बोलतो, त्यांच्याविषयी खूप आदर आहे. नवाब मलिकांविषयीही आदर आहे. पण कधीतरी आंतरमनात झाकून बघा, मग कळेल. मी स्वाभिमान सोडलेला नाही. कोणी काहीही बोलायचे आणि ऐकून घ्यायचे. मी बांगड्या भरलेल्या नाहीत. हिंमत असेल तर माझे आव्हान स्वीकारा आणि समोरासमोर या. बोललो ते बोललोच. माझ्यावर केसेस झाल्यात, पण लोकांना केसेस माहिती आहेत, त्या का झाल्या ते माहिती नाही. अन्यायाविरोधात आवाज उठविला म्हणून माझ्यावर केसेस झाल्याने मी तुरुंगात होतो. ऐन तारुण्यातील २२ महिने घालविले. या लोकांना ही सर्व नौटंकी वाटते. पण नौटंकी तर नौटंकी.. उगीच लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी माझी मैत्री आहे. मी त्यांना काहीही मागितले नाही. केवळ एकच मागितले. साताऱ्यासाठी सर्व काही करा. एक अख्खी पिढी वाया गेली. एक जनता म्हणून तुम्ही विचारणार का त्यांना, त्यांच्या जमिनी गेल्या त्या वेळी सत्ता आमची होती. करून करून काय केले. त्यामुळे चर्चा कशाला, कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकीन, असे स्पष्ट करत इश्‍युबेस राजकारण करण्याऐवजी समाजकारण करा, लोक दुवा देतील, असा सल्लाही त्यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : विदर्भात गारपिटीचा इशारा

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

SCROLL FOR NEXT