सांगलीत दोन हजार खांब कोसळले;  महावितरणला ३५ कोटींचा झटका Two thousand pillars collapsed in Sangli; 35 crore blow to MSEDCL
सांगलीत दोन हजार खांब कोसळले;  महावितरणला ३५ कोटींचा झटका Two thousand pillars collapsed in Sangli; 35 crore blow to MSEDCL 
मुख्य बातम्या

सांगलीत दोन हजार खांब कोसळले;  महावितरणला ३५ कोटींचा झटका

टीम अॅग्रोवन

सांगली : जिल्ह्यात कृष्णा व वारणेला आलेल्या महापुरामुळे महावितरणचे २०५२ खांब कोसळले आहेत. महावितरण कंपनीला प्राथमिक पाहणीनुसार ३५ कोटी रुपयांच्या नुकसानीचा झटका बसला आहे. महापुराचे पाणी असतानाही महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी धोका पत्करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी बजावली.    जिल्ह्यात कृष्णा व वारणेला आलेल्या महापुरामुळे शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील अनेक गावे पाण्याखाली गेली होती. त्यामुळे महावितरणने पुराच्या पाण्यात विजेचा धोका निर्माण होऊ नये. म्हणून वीज पुरवठा खंडित केला. जसे पुराचे पाणी ओसरेल त्याप्रमाणे आवश्यक त्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत केला जात आहे. जिल्ह्यात महापुरामुळे ९४ गावे बाधित झाली होती, तर ९७ हजार ग्राहकांच्या वीज पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला होता. पूर ओसरल्यानंतर आतापर्यंत ९१ गावांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. उर्वरित गावांत अद्याप पुराचे पाणी आहे. ९७ हजार ग्राहकांपैकी ८० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत सुरू करण्यात आला आहे.  २००५, २०१९ मध्ये आलेल्या महापुरावेळी बराच भाग पाण्यात राहिल्यामुळे विजेचे खांब पडणे, वाकणे, वितरण रोहित्र, वाहिन्या खराब होणे आदी प्रकारामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यंदाच्या २०२१च्या महापुराचा पुन्हा एकदा महावितरणला फटका बसला आहे. जिल्ह्यातील उच्च दाब वाहिनीचे ७१७ विद्युत खांब पडले आहेत. लघुदाब वाहिनीचे १३३५ खांब पडलेत. २५१९ वितरण रोहित्र पाण्याखाली गेल्यामुळे ती नादुरुस्त बनली आहेत. १३२ वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे. तर १७ उपकेंद्रे पाण्याखाली असल्यामुळे तेथेही मोठे नुकसान झाले आहे. महावितरणने पूर ओसरल्यानंतर केलेल्या प्राथमिक पाहणीत जवळपास ३५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात महावितरणला मोठा फटका बसला आहे. थकबाकीचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे महावितरणसमोर आर्थिक अडचणी वाढत चालल्या आहेत. तशातच आता महापुराचाही झटका बसला आहे. अशाही अडचणीच्या परिस्थितीत महावितरणने पूरग्रस्त भाग वगळता इतर भागात अखंडित वीज पुरवठा दिला आहे. तर दुसरीकडे पूर ओसरलेल्या ठिकाणी वीज सुरू केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT