कडकनाथ कोंबडी चारशे रुपयाला जोडी
कडकनाथ कोंबडी चारशे रुपयाला जोडी 
मुख्य बातम्या

सिंधुदुर्ग ः कडकनाथ कोंबडी चारशे रुपयाला जोडी

टीम अॅग्रोवन

सिंधुदुर्ग ः फसवणुकीमुळे आर्थिक संकटात सापडलेले घाटमाथ्यावरील पोल्ट्रीधारक आता गावागावांतील आठवडा बाजारांमध्ये कडकनाथ नर-मादीची जोडी अवघ्या चारशे रुपयाला विक्री करीत आहेत. यापूर्वी कडकनाथ कोंबड्याच्या जोडीची किंमत बाराशे ते दीड हजार रुपये होती.

महारयत ॲग्रो कंपनीने हजारो पोल्ट्रीधारकांची फसवणूक केल्याबाबत सांगली, कोल्हापूर, बेळगाव, सिंधुदुर्गासह राज्यभरात तक्रारी दाखल झाल्या आहेत. काही संचालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटकदेखील झाली आहे. पोल्ट्रीधारकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून ती रक्कम कंपनीकडे दिली. त्या बदल्यात कंपनीकडून पोल्ट्रीधारकांना कोंबडीची पिले, खाद्य, औषधे आणि इतर साहित्य पुरविण्यात आले. वेळोवेळी कंपनी पोल्ट्रीधारकांकडून साहित्यांची रक्कम घेत होती. अंडी व कोंबडी खरेदीची हमी कंपनीने घेतली होती. 

सुरवातीला काही पोल्ट्रीधारकांकडून अंडी खरेदीदेखील करण्यात आली. पूर्ण वाढ झालेला कोंबडा साधारणपणे आठशे ते नऊशे रुपयांना खरेदी करणार असे आमिष त्यांना दाखविण्यात आले. या भुलभुलैयात सर्वच फसले. अनेकांनी विविध बँका, पतसंस्थांची कर्ज काढून पोल्ट्रीशेड उभ्या केल्या. कोंबडी आणि अंड्यांना चांगला दर मिळणार असल्यामुळे पोल्ट्रीधारकांनी कसलाही विचार केला नाही. पूर्ण वाढ झालेला कोंबडे ज्या वेळी कंपनीने खरेदी करण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर कंपनीच्या फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आला.

मात्र, फसवणुकीमुळे कडकनाथ कोंबडीपालन करणारे हजारो पोल्ट्रीधारक आर्थिक संकटात सापडले आहेत. बँकांच्या कर्जाचे हप्तेदेखील जात नसल्यामुळे आठवडा बाजारामध्ये जाऊन मिळेल त्या किमतीला विकण्यास सुरवात केली आहे. कोंबड्यांचे विविध गुणधर्म सांगून यापूर्वी कडकनाथ कोंबडा आठशे रुपये, तर मादी चारशे ते पाचशे रुपयांत विक्री केली जात होती. तर जोडी बाराशे ते पंधराशे रुपयाला विक्री केली जात होती. 

मात्र, आता कमी किमतीत कोंबडी मिळत असल्यामुळे लोकदेखील खरेदीकरिता गर्दी करताना दिसत आहेत. परंतु चारशे रुपयाने विक्री करून मुद्दलदेखील मिळणार नाही, असे पोल्ट्रीधारकांचे म्हणणे आहे. परंतु, आता आमच्याजवळ पर्यायच राहिलेला नाही, त्यामुळे शेवटचा पर्याय आम्ही अवलंबला आहे. विशेष म्हणजे कडकनाथ कोंबडी खाल्ल्यामुळे कोणते फायदे होतात याचे फलक टेंपोला लावण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT