संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यात चारा छावण्यांवर आतापर्यंत २०० कोटी खर्च

टीम अॅग्रोवन

नगर  : पशुधन जगविण्यासाठी जिल्ह्यात ५११ चारा छावण्यांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंजुरी दिली आहे. त्यात प्रत्यक्षात ५०१ चारा छावण्या सुरू आहेत. त्यात तीन लाख ३० हजार २४५ जनावरे दाखल आहेत. छावण्या सुरू होऊन नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. आजअखेर छावण्यांवर २०० कोटी रुपये खर्च झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

जिल्ह्यात पहिली चारा छावणी पारनेर तालुक्‍यातील भाळवणी येथे १९ फेब्रुवारीला सुरू झाली. गतवर्षी पावसाने दडी मारल्याने चाराटंचाईचे संकट आहे. जिल्ह्यात लहान-मोठ्या जनावरांची संख्या २८ लाख आहे. यात गाय, म्हैस अशा दुधाळ जनावरांची संख्या १७ लाख आहे. छावणीत लहान- मोठ्या जनावरांची संख्या तीन लाख ३० हजार २४५ इतकी झाली आहे. यात लहान पशुधनाची संख्या ४४ हजार ४३३, तर मोठ्या पशुधनाची संख्या दोन लाख ८५ हजार ८१२ आहे. या जनावरांच्या चाऱ्यासाठी होणारा दैनंदिन खर्च २ कोटी ८८ लाख २ हजार ८५० रुपये आहे. छावणीत बांधलेल्या पशुधनाची सोड-बांध तसेच चारा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी दोन माणसे सध्या रात्रंदिवस छावणीतच आली आहेत. दावणीसमवेत ८५ हजार पशुपालकांचा मुक्काम सध्या छावणीतच आहे.

नियमात कमी-जास्त,  तरीही शेतकरी समाधानी दुष्काळी भागातील जनावरे जगवण्यासाठी ५०१ छावण्या सुरू आहेत. सरकारी नियमानुसार छावण्यांमध्ये चारा, खुराक, आणि पाण्याची व्यवस्था करावी, असा नियम आहे. त्यात कमी- जास्त प्रमाण झाल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळून आल्यास छावणी चालक संस्थेवर कारवाई करण्यात येत आहे. तपासणी पथकाने अनेक छावण्यांवर कारवाई केली. तरीही नियमांची ऐशीतैशी सुरूच आहे. मात्र केवळ छावण्यांमधून जनावरे जगली यातच शेतकरी समाधान मानत आहेत.    

तालुकानिहाय छावण्या (कंसात पशुधन)
तालुका छावण्या पशुधन
पाथर्डी १०७ ६८,२४७
कर्जत ९७ ५८,९६८
जामखेड ६९ ४७,९१९
नगर ६६ ५१,८२४
पारनेर ४१ ३०,५२७
शेवगाव ६४ ३८,५१०
श्रीगोंदा ५६ ३३,८४६
नेवासे ४०४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Exports : खेळखंडोबा शेतीमाल निर्यातीचा!

Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

Lok Sabha Election 2024 : सात हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठविण्यास सुरुवात

Banana Orchard Damage : सारी केळी भुईसपाट

Department Of Water Resources : ‘कृष्णा खोरे’ची ६६८ कोटींची पाणीपट्टी वसुली

SCROLL FOR NEXT