जिल्ह्यातील पंचवीस छावण्यांचा मोडला तळ
जिल्ह्यातील पंचवीस छावण्यांचा मोडला तळ 
मुख्य बातम्या

नगर जिल्ह्यातील पंचवीस छावण्यांचा मोडला तळ

टीम अॅग्रोवन

नगर ः मागील आठवड्यात उत्तरा नक्षत्राने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे शेवगाव, कर्जत, पाथर्डी, जामखेड तालुक्‍यांतील २३ छावण्या बंद झाल्या आहेत. मात्र, जिल्ह्यात पशुधन जगविण्यासाठी कर्जत तालुक्‍यातील ३२ छावण्या अद्यापही सुरूच आहेत. त्यात १९ हजार ५९४ पशुधन असून, अजूनही अनेक भागांत जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.  

नगर जिल्ह्यामध्ये गतवर्षीच्या पावसाने रुसवा धरल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीत शेतकऱ्यांचे पशुधन जगविण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जिल्ह्यात ५११ चारा छावण्या मंजूर केल्या होत्या. जूनपर्यंत यापैकी ५०४ चारा छावण्या सुरू होत्या. त्यात तीन लाख ३६ हजार जनावरे दाखल होती. जूनपासून मागील साडेतीन महिन्यांच्या अवधीत रोहिणी, मृग नक्षत्र काही अपवाद वगळता कोरडे गेले. त्यानंतर प्रत्येक नक्षत्रात पावसाने बहुतांश ठिकाणी हजेरी लावली. त्यामुळे चारा छावण्यांची संख्या घटली. 

जुलैच्या सुरवातीला साडेतीनशे चारा छावण्या बंद झाल्या. मात्र, मागील आठवड्यात उत्तरा नक्षत्राने जिल्ह्यातील ९७ पैकी ९७ महसूल मंडळांत हजेरी लावली. त्यामुळे सुरू असलेल्या ५७ छावण्यांपैकी २५ छावण्यांचा तळ मोडला आहे. केवळ कर्जत तालुक्‍यांत ३२ छावण्या सुरू आहेत. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली. मात्र, अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे मात्र बऱ्यापैकी दिलासा मिळत आहेत. या पावसाने रब्बी पेरणीलाही वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT