संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
मुख्य बातम्या

पुणे जिल्ह्यात ४०० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट

टीम अॅग्रोवन

पुणे  ः शाश्वत आणि अधिक उत्पन्न मिळविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम उद्योगाकडे कल वाढत आहे. मात्र, दरवर्षी कमी प्रमाणात होत असलेल्या पावसाचा फटका तुती लागवडीला बसत आहे. मात्र तरीही रेशीम कार्यालयाकडून तुती लागवडीसाठी दरवर्षी प्रोत्साहन दिले जात आहे. यंदा पुणे जिल्ह्यात ४०० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती पुणे जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. 

गेल्या वर्षीही चारशे एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्यातील २४२ शेतकऱ्यांनी २९० एकरांवर तुती लागवड केली होती. गेल्या काही वर्षांपासून रेशीम कोषाचे दर वाढल्यामुळे मोठ्याप्रमाणात शेतकरी तुती लागवडीकडे वळत आहे. यंदाही जिल्हा रेशीम कार्यालयाने तुती लागवडीवर भर देण्याचे ठरविले. त्यासाठी आवश्यक असलेली नोंदणीची मोहीम गेल्या वर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत राबवली होती. या मोहिमेला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात नोंदणी केल्याचे चित्र आहे. तुती लागवडीसाठी राबविण्यात आलेल्या महारेशीम अभियानांतर्गत ३६३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यांनी शुल्कही भरले आहे. जिल्ह्यात यापूर्वी सुमारे ६०० एकरांहून अधिक क्षेत्रावर तुती लागवडी झालेल्या आहेत. 

जिल्ह्यातील बारामती, पुरंदर, इंदापूर हे तालुके रेशीमसाठी तुतीचे हब म्हणून ओळखले जातात. गेल्या चार ते पाच वर्षांपासून पाणीटंचाई असल्याने तुती लागवडीच्या क्षेत्रात घट झाली. यंदा ४०० एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट आहे. रेशीम कार्यालयाकडून शेतकऱ्यांना लागवडीसाठी तुती बेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच रोपवाटिकेतील रोपे उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकडे वळविण्याच्या उद्देशाने मनरेगातून तुती लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. याशिवाय तुती लागवडीकरिता बेणेपुरवठा, अंडीपुजपुरवठा, शेतकरी प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कमी दराने तुती खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. त्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करून तुती लागवड करण्याचे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी पी. एस. गणाचार्य यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

Sericulture Farming : रेशीम शेतीतून जणू महिन्याचा सक्षम पगार

Heat wave : झारखंड शिक्षण विभागाचा आदेश; उष्णतेच्या लाटेमुळे आजपासून ८ वी पर्यंतचे वर्ग बंद

Success Story : पाणी पुरवठा संस्थांद्वारे मांडकी झाले जलस्वयंपूर्ण

Kolhapur Kharip Crop : यंदा पाऊस चांगला! खरिपाच्या क्षेत्रात होणार वाढ, धुळवाफ पेरणीची तयारी

SCROLL FOR NEXT