हळद लागवड
हळद लागवड  
मुख्य बातम्या

देशात हळद लागवडीत वाढ

Abhijeet Dake

सांगली ः जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हळद उत्पादन घेणाऱ्या राज्यांत दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी हळद लागवडी उरकल्या. देशात यंदा पोषक वातावरण असल्याने आतापर्यंत २ लाख ३८ हजार हेक्टरवर हळदीची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हळदीच्या क्षेत्रात ३.५५ टक्क्यांनी म्हणजेच ८ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले असल्याची माहिती हळद संशोधन केंद्राच्या सूत्रांनी दिली. देशात हळदीचे सरासरी क्षेत्र अडीच लाख हेक्टर इतके आहे. गेल्या वर्षी देशात कमी पाऊस, पाण्याची कमतरता यामुळे २ लाख ३० हजार हेक्टरवर लागवड झाली होती. लागवडीनंतर पावसाचा खंड, रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली होती. मात्र, यंदा हवामान खात्याने वेळेत पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला होता. परंतु पावसाला उशिरा सुरवात झाला. मात्र. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस झाला. यामुळे हळद लागवडीस प्रारंभ झाला. यंदा देशात २ लाख ३८ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ८ हजार हेक्टरने लागवड वाढली आहे. सध्या हळदीला पोषक वातावरण आहे. मध्यंतरी पावसाचा खंड पडला होता. पुन्हा पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे हळदीचे पीक चांगले बहरू लागले आहे. हळद पिकांची वाढ चांगली होऊ लागली आहे. सध्या रोगाचा प्रादुर्भाव कुठेही झाला नसल्याचे हळद संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

या राज्यातील हळदीचे क्षेत्र वाढले हरियाना, त्रिपुरा, नागालॅंड, मणिपूर, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, बिहार, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यात देखील हळदीच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. 

 
राज्यनिहाय हळदीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)
राज्य २०१८ २०१९
तेलंगण ५०,००० ५१,२००
तमिळनाडू २९,३०० ३०,८००
पश्चिम बंगाल १८,००० १९,०००
महाराष्ट्र  १९,७०० २१,३००
आंध्र प्रदेश १६,६०० १७,२००
आसाम १७,१०० १८,०००
इतर राज्य ८०,००० ८१,२००
एकूण २,३०,७०० २,३८,७००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : अकोला, सोलापुरात हंगामातील उच्चांकी तापमान

Indian Politics : चीनवरून काँग्रेसचा मोदी सरकारवर पुन्हा हल्लाबोल

Accident Insurance Scheme : अपघात विमा योजनेतून ४५० शेतकरी कुटुंबांना मदत

Banana Sunburn : उन्हाच्या तीव्रतेमुळे जळताहेत केळीची रोपे

Summer Heat : मालेगावात वैशाखाआधीच वणवा

SCROLL FOR NEXT