हळद
हळद  
मुख्य बातम्या

हळदीचा हंगाम दिलासादायक राहण्याचे संकेत

टीम अॅग्रोवन

वाशिम ः राज्यात या वर्षी हळदीचा हंगाम आशादायक राहण्याचा अंदाज आहे. यामुळे विदर्भात हळदीचे माहेरघर असलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळला. या वर्षी सुरवातीला हळदीचे दर साडेसात हजार ते ८ हजार रुपये क्‍विंटल राहतील, अशी शक्‍यता शिरपूर जैन (जि. वाशीम) येथील हळद उत्पादक डॉ. गजानन ढवळे यांनी व्यक्‍त केली होती. वाशीम जिल्ह्याने सोयाबीनसोबतच गेल्या काही वर्षांत हळद उत्पादनाच्या बाबतीत नवी ओळख मिळविली आहे. लागवड क्षेत्र वाढते असल्याने रिसोड व वाशीम बाजार समितीत आठवड्यातील ठराविक दिवशी हळद खरेदी होते; परंतु स्थानिक बाजारात विकण्याऐवजी हिंगोली बाजारपेठेत शेतकरी हळद विक्रीला प्राधान्य देतात. या वर्षी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू राज्यात हळदीखालील कमी झालेले लागवडक्षेत्र त्यासोबतच पाण्याच्या उपलब्धतेचा फटका बसत महाराष्ट्रातदेखील उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हळदीला चांगले दर राहतील, असा अंदाज आहे.  गेल्या वर्षी हळदीचे दर साडेचार ते पावणेपाच हजार रुपये प्रतिक्‍विंटलवर पोचले होते. २०१७ च्या जुलैनंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये दरात वाढ होण्यास सुरवात हाेत हे दर ९ ते साडेनऊ हजार रुपयांवर पोचले. या वर्षी सांगली बाजारात नव्या हळदीची आवक झाली. त्या वेळी मुहूर्तला साडेतेरा हजार रुपये क्‍विंटलचा दर मिळाला होता. आता हे दर साडेआठ ते नऊ हजार रुपये क्‍विंटलवर स्थिरावल्याचे डॉ. गजानन ढवळे यांनी सांगितले. एप्रिलपासून होतो हंगाम सुरू निझामाबाद ही हळदीकरिता मोठी पेठ आहे. तेथील आवक दरावर परिणाम करणारी ठरते. महाराष्ट्रातदेखील एप्रिलपासून हंगाम जोरात सुरू होतो. मार्चमध्ये काढणी त्यानंतर तीन आठवड्यांची सरासरी प्रक्रिया करून हळद बाजारात पोचते. आंध्र प्रदेश तसेच सांगली परिसरात पूर्वहंगामी म्हणजेच अक्षयतृतीयेला लागवड होते. त्याची आवक जानेवारीत सुरू होते. उर्वरित भागात दीड महिन्यानंतर लागवड होते. त्यामुळे बाजारातील आवकदेखील उशिरा होते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दर चांगले राहतात. संक्रातीनंतर दर कमी होतात, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT