Turmeric in Kandakuji in Nanded
Turmeric in Kandakuji in Nanded 
मुख्य बातम्या

नांदेडमध्ये हळदीला कंदकुजीचा फटका

टीम अॅग्रोवन

नांदेड : जिल्ह्यात हळदीवर कंदकूज या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीचे कंद जमिनीत सडून पीक अकाली वाळत असल्याचा प्रकार अनेक ठिकाणी दिसून येत आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांना सोयाबीन, तुरी पाठोपाठ हळदीच्या उत्पादनाचाही फटका बसण्याची शक्यता आहे.

नांदेड जिल्ह्यात वीस ते पंचवीस हजार हेक्टरवर हळदीची लागवड होते. इतर पिकांच्या तुलनेत हमखास उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी या पिकाकडे वळले आहेत. परंतु यंदा हळदीचे उभे पीक काढणीला येण्यापूर्वीच वाळूत जात असल्याने शेतकरी अडचणीत आहेत. जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांसह बागायती पिकाला फटका बसला आहे. या पिकालाही या अतिवृष्टीचा फटका बसल्याचे सध्या दिसून येत आहे. 

सततच्या पावसामुळे ही कंदकूज झाल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. हळद पीक काडी धरण्याच्या अवस्थेत असताना पिकावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे हळदीचे झाड खालून वाळत असल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. याबाबत अनेक उपाययोजना करूनही पिकावर परिणाम होत नसल्याने शेतकऱ्यांचे ३० ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. हदगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची माहिती ‘आत्मा’चे हदगाव तालुका व्यवस्थापक श्री. खानसोळे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rice Research : अधिक ‘बी१’ जीवनसत्त्व असलेला भात विकसित

Waghad Project : ‘वाघाड’ने घडविला कायापालट

Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०२ गावांना टँकरने पाणी सुरू

Road Work Update : पाणंद रस्त्यांची ८५० हून अधिक कामे ठप्प

Mathadi Worker Protest : माथाडी कामगारांचे सरणावर बसून आंदोलन

SCROLL FOR NEXT