tur
tur  
मुख्य बातम्या

तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता जाहीर 

टीम अॅग्रोवन

परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत यंदाच्या (२०२०-२१) हंगामात शासकीय केंद्रांवर तूर खरेदीसाठी राज्यातील ३४ जिल्ह्यांसाठी निश्चित करण्यात आलेली प्रतिहेक्टरी उत्पादकता जाहीर करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यासाठी सर्वाधिक २० क्विटंल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्वांत कमी ४ क्विंटल उत्पादकता आहे. 

२०२०-२१ मधील खरीप हंगामात किमान आधारभूत किंमत योजने अंतर्गत २ लाख ८९ हजार ५० टन तूर खरेदीचे उद्दिष्ट आहे.त्यासाठी नाफेड तर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या खरेदी केंद्रांवर २८ डिसेंबर पासून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. या केंद्रांवर तूर खरेदी व्यवस्थित व सुरळीतपणे होण्यासाठी कृषी विभागाच्या दुसऱ्या आगाऊ अंदाजानुसार जिल्हानिहाय उत्पादकतेनुसार प्रति शेतकरी तूर खरेदी करण्यात यावी असे आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी राज्य सहकारी पणन महासंघाचे (मुंबई) व्यवस्थापकीय संचालक, विदर्भ सहकारी पणन महासंघाचे (नागपूर) कार्यकारी संचालक, महाएफपीसीचे (पुणे) चे व्यवस्थापकीय संचालक यांना दिले आहेत.  तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)  जिल्हा : उत्पादकता  औरंगाबाद : ८.११  जालना : २०.००  परभणी : ६.५०  हिंगोली : ८.१५  नांदेड : ८.५०  लातूर : ६.२०  उस्मानाबाद : ६.८०  बीड : १५.७५  ठाणे : ५.४८  पालघर : ४.४४  रायगड : ५.८६  रत्नागिरी : ४.१५  सिंधुदुर्ग : ४.००  नाशिक : १२.९६  धुळे : ५.५०  नंदुरबार : ५.५०  जळगाव : १२.३४  नगर : ९.५०  पुणे : ६.२०  सोलापूर : ८.८९  सातारा : १२.००  सांगली : ७.३२  कोल्हापूर : १०.७५  अमरावती : ५.००  अकोला : १२.००  बुलडाणा : ९.२७  वाशीम : ७.५०  यवतमाळ : ९.००  नागपूर : १२.४४  वर्धा : ९.००  भंडारा : ५.५०  गोंदिया : ७.१०  चंद्रपूर : १४.५०  गडचिरोली : ११.८९ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT