हरभरा
हरभरा  
मुख्य बातम्या

लातुरात हरभरा खरेदी योजनेचा फज्जा

हरी तुगावकर

लातूर ः जाहिरातबाजी करून आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने कसे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाने लातूर जिल्ह्यात आतापर्यंत आॅनलाइन नोंदणी करणाऱ्या २३ हजारपैकी केवळ ७३ शेतकऱ्यांची ९६३ क्विंटलच हरभऱ्याची खरेदी केली आहे. त्यामुळे शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्र योजनेचा जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे दिसत आहे, तर दुसरीकडे सोमवारी (ता. १६) लातूर बाजारपेठेत २०० रुपयांनी हरभऱ्याचे भाव गडगडले. सध्या शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा किमान एक हजार रुपये कमी दराने बाजारपेठेत हरभरा विक्री करण्याची वेळ आली आहे.  लातूर जिल्ह्यात एप्रिलपासून हरभरा खरेदी सुरू केली आहे. यात पहिल्यांदा शेतकऱ्यांना आॅनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. बाजारपेठेत भाव कोसळल्याने शेतकऱ्यांच्या आशा या खरेदी केंद्रावर आहेत. यातूनच जिल्ह्यातील २३ हजार शेतकऱ्यांनी हरभऱ्यासाठी आॅनलाइन नोंदणी केली आहे. आॅनलाइन नोंदणीनंतर शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे हरभरा घेऊन येण्यासाठी सांगितले जाते. या वर्षी तुरीनंतर शासनाने उशिरा हरभऱ्याची हमीभावाने खरेदी सुरू केली आहे. सध्या तुरीनेच शासनाचे गोदाम भरले आहेत. त्यालाच जागा नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हरभरा खरेदीवरही होताना दिसत आहे.   आतापर्यंत २३ हजारपैकी केवळ ३७१ शेतकऱ्यांनाच ३७१ जणांना एसएमएस करण्यात आले. आतातर एसएमएस पाठवणेच एक प्रकारे बंद करण्यात आले आहे. आतापर्यंत केवळ ७३ शेतकऱ्यांचा ९६३ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. त्यात उदगीर १९८ क्विंटल, अहमदपूर ३० क्विंटल, औसा ६८ क्विटंल, चाकूर ४५९ क्विंटल, लोणी केंद्रावर २०७ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला आहे. ४२ लाख ३० हजार ४४४ रुपयांची ही खरेदी आहे. लातूर, रेणापूर, देवणी, नळेगाव, साकोळ, सताळा, जळकोट केंद्रावर एक क्विंटलही खरेदी नाही. या योजनेचा सध्या तरी लातूर जिल्ह्यात फज्जा उडाल्याचे चित्र आहे.  लातूर जिल्ह्यातील आॅनलाइन हरभरा नोंदणीची स्थिती 

खरेदी केंद्रे आॅनलाइन नोंदणी   पाठविलेले एसएमएस
अहमदपूर   ३,६६२  २५
औसा    ४,४५५     २१
 चाकूर    ३,४५०   ८०
देवण १,४९९ ००
जळकोट     ४   ००
लातूर ८७०  ४७
लोण   २१२ ६२
नळेगाव   ४५५  १०
निलंगा ३,७७४ ००
रेणापूर  ४५५  ७
साकोळ १,२३४  ००
सताळ  ४९  ००
उदगीर  २,८८४   ११९
एकूण २३,००३  ३७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

Maharudra Mangnale : निव्वळ कोरडवाहू शेती ही शेती नाहीच! 

Indrjeet Bhalerao : तांदूळवाडी ते मेरठ : एका प्रज्ञेचा प्रवास

SCROLL FOR NEXT