gram and tur
gram and tur 
मुख्य बातम्या

नगर : ‘कोरोना’ संसर्गाच्या भीतीने तूर खरेदीचा वेग मंदावला 

टीम अॅग्रोवन

नगर ः हमी दराने तूर, हरभऱ्याची खरेदी सुरू आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून तूर व हरभरा खरेदीला काहीसा ब्रेक लागला आहे. तुरीची खरेदी करण्यासाठी केंद्रावर गर्दी होऊ नये म्हणून एकाच वेळी नाही तर टप्प्याने शेतकऱ्यांना बोलावले जात आहे. एसएमएस दिलेले असले तरी सध्या हरभरा खरेदी स्थगित असल्याचे सांगितले जात आहे. 

यंदा राज्यात जवळपास एकशे साठ खरेदी केंद्रावर तूर खरेदी केली जात आहे. नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत ४६ हजार ५५० क्विंटल तुरीची ७ हजार ५४४ शेतकऱ्यांकडून खरेदी केली आहे. अजून पन्नास टक्के शेतकरी विक्री करायचे राहिले आहेत. तूर खरेदी सुरू असलेल्या केंद्रावर आता हरभरा खरेदीसाठी नोंदणी केली जात आहे. आतापर्यंत सव्वा बाराशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

तूर, हरभरा खरेदी केंद्रांवर माल घेऊन विक्रीला येण्यासाठी मोबाईलवर संदेश दिले जातात. तूर विक्रीला आणावी म्हणून १३ हजार शेतकऱ्यांना तर हरभरा विक्रीला आणावा म्हणून साधारण पावणेदोनशे शेतकऱ्यांना एसएमएस पाठवले आहेत. मात्र, गेल्या चार दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने व प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केल्याने हरभरा, तूर खरेदीला काहीसा ब्रेक लागल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रचालकांनी अनेक शेतकऱ्यांना तूर, हरभरा विक्रीला आणावा यासाठीचे एसएमएस दिलेले असले तरी दहा-दहा शेतकऱ्यांचे ग्रुप केले असून दर तासाला दहापेक्षा अधिक शेतकरी केंद्रावर येणार नाहीत याची काळजी घेतली जात आहे. 

आलेल्या दहा शेतकऱ्यांची खरेदी संपल्यानंतर पुढील शेतकऱ्यांना बोलावले जात आहे. त्यामुळे खरेदीचा वेग कमी झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे सध्या तूर खरेदीचा वेग मंदावला आणि हरभरा खरेदी थांबलेली असली तरी संसर्गाची बाधा वाढण्याचा अंदाज दिसला तर तूर खरेदीही थांबू शकते असे दिसत आहे. तूर खरेदी २९ मार्चपर्यंत होणार असून १५ एप्रिलपर्यंत नोंदणीची मुदत वाढवली असल्याने खरेदीलाही मुदत वाढ मिळणार असल्याचे सांगितले.  हरभरा खरेदी सध्या नाही  हमी केंद्रावर हरभरा खरेदी करण्यासाठी नोंदणी सुरू आहे. आत्तापर्यंत साधारण १२६७ शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी नोंदणी केलेली असून त्यातील पावणेदोनशे शेतकऱ्यांना एसएमएसही दिलेले आहेत. मात्र, तूर खरेदी केंद्रावरच हरभरा खरेदी केली जात आहे. मात्र, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खरेदी केंद्रावर गर्दी होणार नाही याची काळजी घेत सध्या हरभरा खरेदी काही दिवसासाठी स्थगित केली आहे. आत्तापर्यंत फक्त कर्जत येथील केंद्रावर तीन शेतकऱ्यांची १५ क्विंटल खरेदी झाली असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

Sharad Joshi : शरद जोशींचा अंगारमळा लवकरच इतिहास जमा होईल...

Kharif Season : खते, बी-बियाणे वेळेत उपलब्ध करा

Crop Insurance : केळी विमाधारक वादळात नुकसानीच्या परताव्यांपासून वंचित

SCROLL FOR NEXT