अमरावती : मेळघाटातील आदिवासी महिलांच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी ‘मेळघाट हाट’चा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येत आहे. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन व परिपूर्ण नियोजन करावे. या उपक्रमातून मेळघाटातील भगिनींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा. त्यासाठी ‘मेळघाट हाट’ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करावी, असे निर्देश महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले. महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आदिवासी महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या विपणनासाठी ‘मेळघाट हाट’ प्रकल्प आकारास येत आहे. त्याअनुषंगाने नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण व चर्चेसाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यावेळी उपस्थित होते. ‘माविम’चे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले. ठाकूर म्हणाल्या, ‘‘मेळघाटात स्थानिक महिला भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी बचत गटांचे जाळे निर्माण करण्यात आले. या महिलांकडून अनेक उत्कृष्ट उत्पादने निर्माण होतात. त्यात विविधता आणणे, या नैसर्गिक उत्पादनांची वैशिष्ट्ये जगापुढे आणणे व विपणनाचे जाळे भक्कम करणे यासाठी मेळघाट हाटचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल.’’
संशोधन करा, नव्या संकल्पना राबवा ठाकूर म्हणाल्या, मेळघाटचा ब्रँड जगभर पोहोचण्यासाठी विपणन पद्धतीचे अधिकाधिक संशोधन करून, अभिनव संकल्पना राबवल्या पाहिजेत. मेळघाट महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यात विभागला गेला आहे. मध्य प्रदेशातील उत्पादने, वैशिष्ट्ये, स्वरूप यांचाही विचार प्रकल्पात व्हावा. मेळघाटच्या पारंपरिक उत्पादनांचा समावेश करावा. गटांच्या सदस्यांना आर्थिक बाबींचे प्रशिक्षण मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असे सेठी यांनी सांगितले.
मेळघाटात आहेत २५ हजार महिला गट सदस्य मेळघाटात ‘एमएसआरएलएम’ व ‘माविम’कडून २ हजार ३५९ महिला स्वयंसहायता गट असून, २५ हजारांहून महिला सदस्य या गटांत सहभागी आहेत.
आधुनिक विक्री केंद्र उपक्रमात अमरावती शहरात मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक विक्री केंद्र, माल साठवणुकीसाठी गोदाम, वाहतूक व्यवस्था, हरिसाल, धारणी, सेमाडोह व चिखलदरा येथे उत्पादने व संकलन केंद्रे असतील.
मॉलचे संचालन संपूर्णतः महिलांद्वारे मॉलचे संचालन संपूर्णत: महिलांद्वारे करण्यात येईल. विविध गृहोपयोगी, हस्तनिर्मित कला वस्तू, खाद्यपदार्थ, धान्य, सेंद्रिय ताजा भाजीपाला, फळे, वनौषधी आदी उपलब्ध असेल. महिला बचत गट आपल्या दारी, उपक्रमात घरपोच सेवेबरोबर ऑनलाइन विक्रीही होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.