वऱ्हाडातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरळीत
वऱ्हाडातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरळीत 
मुख्य बातम्या

वऱ्हाडातील बाजार समित्यांमध्ये व्यवहार सुरळीत

टीम अॅग्रोवन

अकोला : पणन संचालकांनी एक सप्टेंबरला तातडीचे पत्र जिल्हा उपनिबंधकांना पाठवले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेल्या वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमधील व्यवहार सुरळीत होत असून, अकोला जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या सुरू झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक जी. जी. मावळे यांनी दिली.         

हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी केल्यास एक वर्ष कैद व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा, अशी सुधारणा शासन करीत असल्याची चर्चा सुरू झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली होती. वाशीम जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांना मंगळवारी (ता. ४) पणन संचालकांचे पत्र दिले अाहे. यामुळे उद्यापासून बाजार समित्या सुरू होतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी दिली.

बुलडाणा जिल्ह्यात अद्याप काही बाजार समित्यांमध्ये बंद कायम होता. पणन संचालकांचे पत्र बाजार समित्यांना दिले असून तोडगा काढण्यासाठी स्थानिक पातळीवर बैठका होत अाहेत. तीन बाजार समित्यांमध्ये सोमवारपासून व्यवहार सुरू झाले, असे बुलडाणा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण म्हणाले. या जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असलेल्या खामगावमध्ये मंगळवारी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेण्यात अाली. शासनाच्या अावाहनानंतर लगेच तीन बाजार समित्यांमधील व्यवहार सुरू झाले होते. राहिलेल्या ठिकाणी तोडगा काढण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले.

कोट्यवधींचा फटका काही बाजार समित्या २३ अाॅगस्ट, तर काही त्यानंतर दोन दिवसांनी बंद झाल्या. भुसार व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली होती. याचा परिणाम शेतकऱ्यांच्या शेतमालाला घ्यायलाही कोणी तयार नव्हते. मुगाचा हंगाम सुरू झाला असून नेमक्या हंगामाच्या तोंडावर झालेल्या कोंडीमुळे शेतकरी चिंतातूर बनला होता. अाता बाजार पूर्ववत होत असून मुगाची अावकही या अाठवड्यापासून वाढण्याची शक्यता अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain : विदर्भात पावसाचा अंदाज; पावसासोबतच राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका कायम

Fodder News : विक्रीसाठी चारा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करा; पशुसंवर्धन आयुक्तांचे आदेश

Agriculture Land : नसलेल्या जमिनीचा शोध!

Crop Management : जमीन, पाऊसमानानुसार करा कोरडवाहू पिकाचं नियोजन

Watermelon Cultivation : प्रयोगशीलता जपत केली खरबूज लागवड

SCROLL FOR NEXT