lemons  
मुख्य बातम्या

श्रीगोंद्यात व्यापाऱ्यांनी पाडले लिंबाचे दर

लिंबाला सध्या बाहेर मागणी नाही. लिंबू आणूच नका असे सांगितले जाते. त्यामुळे लिंबाचे दर पडले आहेत. गावातील अथवा कुठलाही व्यापारी यात मनमानी करीत नाही. - उमेश पोटे, व्यापारी,संचालक, बाजार समिती, श्रीगोंदे.

संजय काटे

श्रीगोंदे, जि. नगर : कायम उत्पन्न देणाऱ्या लिंबाचे दर श्रीगोंदा तालुक्यात व्यापाऱ्यांनी पाडल्याने शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत. मागील आठवड्यात १७ ते २० रुपये किलो दराने विकले जाणारे लिंबू अचानक ५ ते ७ रुपये किलोवर आणले आहेत. बाजार समित्या बंद असल्यामुळे मागणी नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी साखळी करुन दर पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेषतः गावागावांत वजन काटे घेऊन बसणाऱ्या आणि शेतकऱ्याची लुट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर बाजार समितीसह कोणाचेही बंधन नसल्याचे दिसून येत आहे.  उसाचे आगार समजल्या जाणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यात सात हजार हेक्टरवर लिंबू बाग आहे. मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना लिंबासाठी हक्काची बाजारपेठ नसल्याने त्यांची लूट होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. श्रीगोंद्यातून सध्या सुमारे १०० टन लिंबू रोज बाहेर जाते. प्रामुख्याने मुंबई व पुणे भागात तर पंजाब, राजस्थान, दिल्ली या राज्यात काही प्रमाणात लिंबू जातो. चार दिवसांपूर्वी गावातील छोटे व्यापारी १७ ते १८ रुपये किलो दराने लिंबू खरेदी करीत होते. मात्र अचानक हेच लिंबू दोनच दिवसात ५ ते ७ रुपयांवर आणले. त्यासोबतच प्रत्येक शेतकऱ्यांच्या लिंबात वजनात २ किलोपर्यंत हक्काची कपात केली जाते. त्याचे ठोस कारण कुणालाही देता येत नाही. मागणी नाही, उठाव नाही, असे सांगून शेतकऱ्यांची अडचण वाढविण्याचे काम श्रीगोंद्यात होत आहे. वाडी, गाव येथे किरकोळ स्वरूपात लिंबू खरेदी करणारे व्यापारी हे लिंबू श्रीगोंदे बाजार समितीत विकतात. तेथून ते मुंबईसह परराज्यात जातात. लिंबू पिकाची स्थिती 

  • श्रीगोंद्यात तालुक्यात हजार हेक्टर क्षेत्र
  • सध्या रोज सुमारे १०० टन लिंबू बाहेर विक्रीला जाते.
  • तालुक्यात लिंबू खरेदी करणारे ५०० छोटे व्यापारी 
  • व्यापाऱ्यांची संघटना असल्याने दर पाडले
  • जास्त दराने विक्री मुंबईतील एका व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर माहिती देताना सांगितले की, श्रीगोंद्यात ५ ते ७ रुपयांनी खरेदी होणारे लिंबू आम्ही २० ते २२ रुपयांनी घेतो. किरकोळ बाजारात तर २० रुपयाला ४ लिंबू देतात, अशी भीषण अवस्था आहे. एका किलोत ३० लिंबू बसतात. प्रतिक्रिया कुठलाही व्यापारी शेतकऱ्यांवर मनमानी करीत असला तर त्यावर थेट कारवाई करु. या व्यापाऱ्यांवर निर्बंध नसले म्हणजे मनमानी करु शकतात, असे नाही. अधिक माहिती घेऊन गरज पडली तर पुढे होऊन कारवाई करु. - महेंद्र माळी, तहसीलदार, श्रीगोंदे.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Power Supply Disconnected: तीन हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

    Sugarcane Drip Irrigation: उसासाठी ठिबक सिंचन संचाची निवड

    Fishermen Relief: अतिवृष्टिग्रस्त मच्छीमारांसाठी मदतीचा प्रस्ताव

    Agri Logistics: उत्पादन ते वाहतूक महत्त्वाचे टप्पे

    Chandrapur Congress: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये फूट?, धानोरकरांचा वेगळा गट, भाजपकडून नगरसेवकांना १ कोटीची ऑफर, वडेट्टीवारांचा दावा

    SCROLL FOR NEXT