Opposition Protest Maharashtra Vidhan Bhavan: विरोधकांनी मंगळवारी विधानभवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. मंत्री झिरवळांचा राजीनामा झालाच पाहिजे, अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली. ''मंत्रालयात लक्ष्मीदर्शन...झिरवळ राजीनाम्या द्या, फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हप्त्याने, भ्रष्टाचारी मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे'', अशा घोषणा देत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला. .काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि इतर नेत्यांचा या आंदोलनात सहभाग होता. त्यांनी झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलक हातात घेतले होते..Maharashtra Assembly Budget Session 2026: राज्यपालांचे अभिभाषण; विदर्भ विकास, समृद्धी महामार्ग विस्तार आणि कृषी एआयवर भर.मंत्रालयात राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला होता. या कारवाईदरम्यान झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिकाला लाच घेताना रंगेहात पकडले होते. यावरुन विरोधकांनी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर झिरवळ यांनी या प्रकरणात माझा संबंध आढळून आल्यास राजीनामा देईन, असे स्पष्ट केले आहे. .Devendra Fadnavis On Ajit Pawar: 'मित्रशोक आपल्या अंतस्थ आत्म्यालाही जाळतो', अजितदादांच्या आठवणींनी मुख्यमंत्री फडणवीस भावूक.मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. लाचखोरीप्रकरणी मंत्र्याचे कार्यालय सील केल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. भाजप महायुती सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती. निष्पक्ष चौकशीसाठी मंत्री नरहरी झिरवळांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.