येवल्यात कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यास मारहाण
येवल्यात कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यास मारहाण 
मुख्य बातम्या

येवल्यात कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यास मारहाण

टीम अॅग्रोवन

येवला, जि. नाशिक : विक्रीला आणलेल्या कांद्यात वांधा घालीत व्यापाऱ्याने एका शेतकऱ्याला जबर मारहाण केल्याने त्यास रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत. हा प्रकार बाजार समितीच्या आवाराबाहेर व्यापाऱ्याच्या खळ्यावर घडला आहे. व्यापाऱ्याच्या या मुजोर वागण्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत असून, संबंधित व्यापाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

बुधवारी रात्री अनकुटे येथील वाल्मीक गायकवाड या शेतकऱ्याने येथील एका बड्या व्यापाऱ्याच्या खळ्यावर खरेदीसाठी आलेल्या मनमाड येथील व्यापाऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या कांद्यावरून वांधा घातला होता. कांद्याच्या प्रतीवरून व्यापाऱ्याने कांदा खाली करण्यास नकार दिला. यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यास जबर मारहाण करण्यात अाली, काही काळ व्यापाऱ्यांच्या खळ्यावर श्री. गायकवाड बेशुद्ध अवस्थेत पडून होते. काही वेळाने गायकवाड यांना खासगी रुग्णालयात नातेवाईक मित्रांनी दाखल केले. दोन दिवस बाजार समितीची सुटी असल्याने हा प्रकार शनिवारी उघडकीस आला.

बाजार समिती प्रशासनाने हा व्यापारी आपल्याकडील नसल्याचे सांगितले आहे. बुधवारी सायंकाळी कार्यालय बंद झाल्यावर शेतकरी व व्यापारी यांच्यात हाणामारी झाली. तो व्यापारी बाजार समितीचा नसून हा वाद खळ्यावर झाला असल्याने यात बाजार समितीचा कुठलीही भूमिका येत नाही, असे सचिव डी. सी. खैरनार यांनी सांगितले. या प्रकरणी रविवारी (ता. ४) दुपारपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

...थेट मारायलाच सुरवात केली “त्या व्यापाऱ्याने माझे कांदे घेतल्यावर त्यात वांधा म्हणजे कुरापत काढली. मी वांधाबिंधा काही नसून माझे कांदे व्यवस्थित भरून द्या असे सांगितले. यावर थेट मारायलाच सुरवात केली. व्यापाऱ्याने मारल्यावर मी रामेश्वरदादाच्या खळ्यात गेलो. तेथे मी पाऊण तास पडलो. मात्र एकाही व्यापाऱ्याने मला उचलले नाही. उलट्या प्रमाणाबाहेर झाल्या असून, त्यामुळे कुणीच उचचले नाही. लहान भावाने व त्याचे जोडीदार होते त्यांनी येथे दवाखान्यात आणले,’’ असे वाल्मीक गायकवाड यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Weather Update : कोकणात उन्हाचा चटका ठरणार तापदायक

Fire In MP Forest : धुमसणाऱ्या उत्तरराखंडमुळे मध्यप्रदेश अलर्ट; थेट कारवाई करण्याचे संकेत

Uttarakhand Forest Fire : धुमस्ते उत्तराखंड!; नैनितालनंतर गढवालपासून कुमाऊंपर्यंत जंगलात ४० ठिकाणी वणवा

Dairy Record Keepnig : दुग्धव्यवसायात नोंदी ठेवण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT