चांदूरबाजार बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू
चांदूरबाजार बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू 
मुख्य बातम्या

चांदूरबाजार बाजार समितीत तूर खरेदी केंद्र सुरू

टीम अॅग्रोवन

अमरावती ः चांदूरबाजार बाजार समितीत राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते नाफेडच्या तूर खरेदी केंद्राची सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांनी तूर खासगी व्यापाऱ्यांना न विकता नाफेडच्या केंद्रावरच विकण्याचे आवाहन कडू यांनी या वेळी केले.  बाजार समितीचे सभापती सतीश बोंडे, उपसभापती अरविंद लंगो, शिवाजी बंड, माजी सभापती मंगेश देशमुख, संचालक सुभाष मसराम, विनोद जवंजाळ, मनोज नांगलिया, सचिव मनीष भारंबे यांच्यासह नाफेडचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसोबतच शेतीला पूरक व्यवसायाची जोड देण्याची आवश्‍यकता असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्‍त केले.  नाफेडच्या माध्यमातून ५८०० रुपये क्‍विंटलच्या हमीभावात तुरीची खरेदी होत असून, बाजारात सद्य:स्थितीत ४३०० ते ४९०० रुपये प्रतिक्‍विंटल असा दर तुरीला मिळत आहे.  शेतकऱ्यांना मिळाला दिलासा  बाजारात तूर आल्यानंतरही हमीभाव केंद्र सुरू झाले नव्हते. परिणामी, बाजारात कमी दराने तुरीची खरेदी करून शेतकऱ्यांच्या लुटीचे प्रकार घडले. पैशाची गरज असल्याने शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील तूर विकली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT