A torrential downpour in Konkan, Central Maharashtra
A torrential downpour in Konkan, Central Maharashtra 
मुख्य बातम्या

Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधारेचा इशारा

टीम अॅग्रोवन

पुणे : पोषक हवामानामुळे राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. आज (ता. १४) कोकणात बहुतांशी ठिकाणी तर उर्वरित राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात  मुसळधार तर राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम असून, गुजरातच्या नालियापासून कमी दाब क्षेत्र, खांडवा, बालाघाट, रायपूर, संभाळपूर ते बंगालच्या उपसागरातील कमी तीव्रतेच्या वादळापर्यंत (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. तर मॉन्सूनच्या आसाला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशापर्यंत ते डीप डिप्रेशनपर्यंत कायम आहे.

कमी तीव्रतेचे वादळ निवळणार बंगालच्या उपसागरातील ठळक कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून ओडिशाच्या किनारपट्टीलगत कमी तीव्रतेच्या वादळाची (डीप डिप्रेशन) निर्मिती झाली आहे. ही प्रणाली जमिनीवर आली असून, ती ओडिशाच्या किनाऱ्यावरील चांदबलीपासून पश्चिमेकडे २० किलोमीटर अंतरावर होती. छत्तीसगड मध्य प्रदेशकडे सरकत असलेल्या या प्रणालीची तीव्रता कमी होत आहे. तर गुजरात आणि परिसरावरही आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.

राज्यात दोन दिवस पावसाचा जोर राहण्याची शक्यता असून, आज (ता. १४) कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.  मुसळधार पावसाचा  इशारा (ऑरेंज अलर्ट) कोकण : पालघर. मध्य महाराष्ट्र : नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर. जोरदार पावसाचा इशारा (एलो अलर्ट) कोकण : मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी. मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदूरबार. मराठवाडा : जालना, परभणी, हिंगोली. विदर्भ : अकोला, अमरावती. विजांसह पावसाचा इशारा (एलो अलर्ट) ः विदर्भ : वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT