जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रक
जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रक 
मुख्य बातम्या

नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रक

टीम अॅग्रोवन

नगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा सोमवारी (ता. १८) होणार आहे. त्यामुळे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. यंदा पदाधिकाऱ्यांनी सुचविलेल्या योजनांचा समावेश अंदाजपत्रकात करण्यात येत आहे. ते सर्वसमावेशक राहावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यात कोणत्या विभागाला झुकते माप मिळणार, या विषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे.

गेल्या वर्षी बांधकाम विभागास पूरक असे अंदाजपत्रक करण्यात आले होते. पशुसंवर्धन व समाजकल्याण विभागावरही विशेष भर देण्यात आला होता. त्यात जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची व मोऱ्यांची कामे, हायमॅक्‍स सौरदिवे, पथदिवे बसविणे, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास साहित्य पुरवठा करणे, समाजकल्याण विभागांतर्गत विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, पशुपालकांचे अभ्यास दौरे, शाळा खोल्यांची दुरुस्ती, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल, बालआनंद मेळावे साजरे करणे, दफनभूमीसाठी अनुदान, अशा विविध वैशिष्ट्यपूर्ण योजनांचा समावेश करण्यात आला होता.

येत्या अंदाजपत्रकात पदाधिकारी, सदस्यांच्या सूचना विचारात घेण्यात आल्या आहेत. शिर्डी संस्थानने शाळा खोल्यांच्या बांधकामासाठी निधी दिला असला, तरी त्यातील काही हिस्सा जिल्हा परिषदेला द्यावा लागणार आहे. त्याबाबतही तरतूद होण्याची शक्‍यता आहे.

अंगणवाड्यांच्या इमारती, आरोग्य केंद्रांची देखभाल व दुरुस्ती आदींसाठी विशेष तरतूद होऊ शकते. त्याचप्रमाणे समाजकल्याणअंतर्गत अंध, अपंगांसाठी विशेष तरतूद केली जाऊ शकते. ग्रामीण पाणीपुरवठ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प, शेतकऱ्यांना शेती उपकरणांसाठी अर्थसाह्य यांसह महिलांसाठी नावीन्यपूर्ण योजनांचा समावेश होण्याची शक्यता आहे.

काम अंतिम टप्प्यात

लेखा व वित्त विभागाने अंदाजपत्रक अंतिम करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांकडून तरतुदी मागविल्या होत्या. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीही विभागप्रमुखांच्या बैठका घेतल्या. अंदाजपत्रकाचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून, तो अंतिम करण्याचे काम सुरू आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यातबंदी उठवली, मात्र निर्यात वाढणार नाही याचीही सोय केली

Indian Monsoon : पाऊसकाळ उत्तम, पुढे काय?

Bachchu Kadu : देशात धर्म नाहीतर शेतकरी संकटात, बच्चू कडूंचा विरोधकांवर 'प्रहार'

Water Scarcity : आडातच नाही, तर...

Agriculture Department : राज्याला मिळेना विस्तार संचालक

SCROLL FOR NEXT