Tomato growers should be given Rs 50,000 per acre 
मुख्य बातम्या

टोमॅटो उत्पादकांना एकरी ५० हजार रुपये मदत द्यावी

टोमॅटोचे दर कमी झाली. महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एकरी किमान ५० हजार रुपयाचे अनुदान द्यावे,’’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिली.

टीम अॅग्रोवन

लातूर : ‘‘टोमॅटोचे दर कमी झाली. महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एकरी किमान ५० हजार रुपयाचे अनुदान द्यावे,’’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिली.

मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविल्याचे नागरगोजे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सध्या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळला. त्यामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या टोमॅटोच्या २५ ते ३० किलोच्या कॅरेटला ८० ते १०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच २ ते ३ रुपये किलो, असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. टोमॅटोचा एकरी उत्पादन खर्च हा १ लाख रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तर लांबच सध्याच्या भावात वाहतूक व तोडणीचा खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे. 

बहुतांश शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत, अथवा गुराढोरांना खायला टाकत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकारने उभे राहावे. शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत शासनाने देऊन त्यांना दिलासा द्यावा. पणन मंडळाद्वारे सरकारने प्रतिकिलो १० रुपये दर निश्चित करावी. मागणी असलेल्या राज्याबाहेरील बाजार समित्यांमध्ये टोमॅटो पाठवावे. जेणेकरून, दरामध्ये सुधारणा होईल. राज्य सरकार काहीच मदत शेतकऱ्यांना करत नाही, अथवा या प्रश्नावर बोलतही नाही, हे न उलगडणारे कोडे असल्याचेही निवेदनात नमूद आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT