कारहुणवीनिमित्त कसबा शेतकरी संघटनेतर्फे आज बैलजोड्यांची मिरवणूक
कारहुणवीनिमित्त कसबा शेतकरी संघटनेतर्फे आज बैलजोड्यांची मिरवणूक  
मुख्य बातम्या

कारहुणवीनिमित्त आज बैलजोड्यांची मिरवणूक

टीम अॅग्रोवन

सोलापूर : कसबा गणपती शेतकरी संघटनेतर्फे बुधवारी (ता. २७) कारहुणवीनिमित्त बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. याच वेळी कृषिनिष्ठ जीवनगौरव पुरस्कारांचे वितरणही केले जाणार आहे, अशी माहिती केदार मेंगाणे यांनी दिली.

बाळीवेस येथील श्री कसबा गणपती मंदिरात सायंकाळी सहा वाजता मिरवणुकीस प्रारंभ होईल. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्‌घाटन आणि पुरस्कारांचे वितरण होईल. या वेळी श्री सिद्धेश्‍वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, सिद्धेश्‍वर देवस्थान पंच समितीचे विश्‍वस्त संजय थोबडे, मल्लिनाथ मसरे, सोमनाथ भोगडे, सुधीर थोबडे, नंदकुमार मुस्तारे व नगरसेवक आनंद चंदनशिवे उपस्थित राहणार आहेत.

कसबा गणपती मंदिर, टिळक चौक, होटगी स्वामी रस्तामार्गे निघणाऱ्या या मिरवणुकीची सांगाता कसबा गणपती मंदिर येथे होणार आहे.

या शेतकऱ्यांचा होणार गौरव : यंदा आनंद मेंगाणे आणि सिद्धेश्‍वर जोकारे (सोलापूर), लोकेश विभुते (दर्शनाळ, ता. अक्कलकोट) यांना कृषिनिष्ठ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याबरोबरच श्री बृहन्मठ होटगी संस्थेतर्फे कृषी जीवनगौरव पुरस्कार देऊन राजशेखर गुंगे (देगाव) यांना गौरविण्यात येणार आहे. नामदेव दुधभाते आणि कोंडाजी चौधरी यांचा गुंगे परिवारातर्फे रोख बक्षीस देऊन सन्मान होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT