आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक सोहळा
आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक सोहळा 
मुख्य बातम्या

आज शिवजयंती : शिवनेरीवर पारंपारिक जन्मसोहळा

टीम अॅग्रोवन

पुणे : फाल्गुन वद्य तृतीया या तिथीनुसार आज (ता. २३) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होणार आहे. यानिमित्ताने शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  विविध कार्यक्रमांमध्ये सकाळी सात वाजता शिवाई देवीची महापूजा, पालखी मिरवणूक, पारंपरिक पाळणा सोहळा आणि शिवकुंज इमारतीमध्ये अभिवादन सभा होणार आहे. स्मारक समितीच्या कार्यक्रमाला सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, ढोलताशा पथक महासंघाचे पराग ठाकूर या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, तर यंदाचा राजमाता जिजाऊ पुरस्कार कन्या वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक आणि किर्तनकार डॉ. मोहीनी पाबळे यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे, कार्याध्यक्ष मधुकर काजळे यांनी दिली. दरम्यान, शिवजंयतीच्या औचित्याने फाल्गुनी पौर्णिमेला गुरुवारी (ता. २१) सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने शिवनजन्मस्थळी दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Scarcity : वरणगावात १५ दिवसांआड पाणीपुरवठा; नागरिक त्रस्त

Landslides : जम्मू-काश्मीरमध्ये भूस्खलनामुळे घरे कोसळली; ५०० हून अधिक लोकांचे स्थालांतर

Wrestling : आणि कुस्ती शौकीनांच्या ह्रदयाची धडधड वाढायला लागते

Banana Farmer Issue : मेगारिचार्ज योजनेसह केळीचे प्रश्‍न प्रलंबित

Water Scarcity : पाण्याच्या आशेने करमाळ्यात विहिरींची खोदाई

SCROLL FOR NEXT