एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील तीनही संच सुरू 
मुख्य बातम्या

एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील तीनही संच सुरू

टीम अॅग्रोवन

नाशिक : कोळशाची उपलब्धता, विजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीन पैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेगावॅट क्षमतेच्या ३ संचांपैकी संच क्रमांक ४ व ५ मधून पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन सुरू ठेऊन संच क्रमांक ३ स्टँडबाय ठेवण्यात आला होता. मात्र, आता उन्हाळ्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे, त्यामुळे एकलहरे येथील स्टँडबाय ठेवलेला संच क्रमांक तीनदेखील सुरू करण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले असून, त्याद्वारे राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकलहरे येथील एकच संच कार्यान्वित करण्यात आला होता. सध्या एकलहरेचे तीनही संच पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करण्यासाठी सुरू करण्यात आले आहेत. एकलहरे औष्णिक वीज केंद्रात संचालक संचलनाचे पाच सूत्री कार्यक्रमानुसार निरनिराळ्या धेय धोरणांची अंमलबजावणी, नवनवीन संकल्पना, संवादात्मक कार्यक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात येते, त्यामुळे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू केल्यामुळे सर्व अधिकारी अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT