साताऱ्यात ३२३ हेक्‍टरवर पिकांचे मोठे नुकसान
साताऱ्यात ३२३ हेक्‍टरवर पिकांचे मोठे नुकसान 
मुख्य बातम्या

साताऱ्यात ३२३ हेक्‍टरवर पिकांचे मोठे नुकसान

ॲग्रोवन वृत्तसेवा

सातारा : नुकत्याच झालेल्या पूर्वमोसमी वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे कोरेगाव, खटाव, पाटण व माण तालुक्‍यातील ३२३.३६ हेक्‍टर क्षेत्रावरील बागायती व फळपिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये एक हजार २९ शेतकरी बाधित झाले आहेत. सर्वाधिक नुकसान खटाव तालुक्‍यात झाले आहे. सध्या पंचनामे कृषी व महसूल विभागाकडून सुरू असून या नुकसानीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे.  चार दिवसांत झालेल्या पूर्वमोसमी पाऊस व गारपिटीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. याचा सर्वाधिक फटका कोरेगाव, खटाव, माण व पाटण तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बसला आहे.  वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात झालेल्या गारपिटीमुळे कोरेगाव तालुक्‍यात काही ठिकाणी रस्त्यांवर व शेतात गारांचा खच पडला होता. त्यामुळे गारपिटीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबा, कलिंगड, चिकू या फळांची गळ होऊन हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा हिरावला आहे. तसेच कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये आर्थिक आधार ठरलेल्या बागायती पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.  कोरेगाव तालुक्‍यातील ८७ हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले असून, २९१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. खटाव तालुक्‍यातील २३७ हेक्‍टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान होऊन ७२९ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पाटण तालुक्‍यातील एका शेतकऱ्याचे ०.२६ हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तर माण तालुक्‍यातील २.१० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान होऊन आठ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप कृषी विभाग व महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असून या नुकसानीत आणखी भर पडणार आहे. आता या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने आपत्कालीन परिस्थितीत भरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  या पिकांना फटका... टोमॅटो, वांगी, कांदा, भाजीपाला, मका, झेंडू, पपई, घेवडा, हरभरा, बाजरी, मिरची, भोपळा, आंबा, चिकू, कलिंगड, डाळिंब आदी. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT